खाद्यपदार्थांवर जीएसटी, सोशल मीडियावर मिम्सना उधाण

gst_5 %

देशात १८ जुलैपासून अनेक वस्तूंचे जीएसटी स्लॅब बदलण्यात आले आहेत. तर अनेक वस्तूवर 5% जीएसटी लावण्यात आला आहे. चीज, मैदा, गहू, मका, तांदूल, रवा, बेसन, दही यावर 5% जीएसटी लावण्यात आला आहे. यामुळे अनेक लोकांच्या घरातील बजेट बिघडणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक ट्विट केले आहे. यात ,दूध,मैदा,डाळी,तांदूळ इत्यादी वस्तूंवर जीएसटी लागू करण्यात आला आहे. पॅक केलेल्या पनीर, बटर आणि मसाला देखील ५% जीएसटी लागू करण्यात आला आहे. यानंतर ट्विटरवर #PaneerButterMasala ट्रेड होत आहे. अनेक लोकांनी ट्विटरवर कमेंट्सच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, याबाबत अनेक मिम्स व्हायरल होत आहेत

 

जर तुम्ही चीज,मैदा,गहू, मका,तांदूळ,मैदा,रवा,बेसन,दही, पनीर, बटर आणि मसाला हे पदार्थ सुट्टे विकत घेत असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जीएसटी आकारला जाणार नाही. ट्विटमध्ये अर्थमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे.