घरताज्या घडामोडीGoodNews! हैदराबादनंतर बंगळूर, मुंबई, कोलकातासह दिल्लीतही होणार Sputnik v उपलब्ध

GoodNews! हैदराबादनंतर बंगळूर, मुंबई, कोलकातासह दिल्लीतही होणार Sputnik v उपलब्ध

Subscribe

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना कोरोना अटोक्यात आणण्यासाठी कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड या कोरोना लसीचा डोस नागरिकांना देण्यात येत आहे. मात्र या दोन्ही लसींनंतर आता देशाला स्पुतनिक-व्ही ही कोरोना लस मिळाली आहे. भारतात कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. देशात त्याची निर्मिती करणाऱ्या रेड्डीज लॅब या औषधी कंपनीने बुधवारी ही माहिती दिली. यापूर्वी स्पुतनिक-व्ही ही कोरोना लस हैदराबादमध्ये लाँच करण्यात आली होती. आता ती बंगळुरू, मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई आणि इतर शहरांमध्येही उपलब्ध केली जात आहे. डॉ. रेड्डीज लॅबने असे म्हटले की, अद्याप कोव्हिन अ‍ॅपवरुन लोकांसाठी या लसींची नोंदणी सुरू झालेली नाही. ही नोंदणी त्यांच्या व्यावसायिक लाँचिंगनंतर सुरू करण्यात येणार आहे.

- Advertisement -

एएनआय वृत्तसंस्थेच्या मते, कोव्हिन अ‍ॅपवर स्पुतनिक व्ही लसची नोंदणी अद्याप सुरू झालेली नाही. स्पुटनिक व्हीची नोंदणी त्यांच्या कमर्शिअल लॉ लॉन्च नंतर सुरू होणार आहे. भारतात स्पुतनिक व्हीची लस एकाच डोसमध्ये उपलब्ध होणार आहे. जी कोरोना विषाणूवर ९१ टक्के प्रभावी असल्याचे म्हटले जाते. स्पुतनिक व्ही लस बद्दल असा दावा केला जात आहे की, ती डेल्टा व्हेरिएंटविरुद्धही अतिशय प्रभावी आहे, ज्याने आपला प्रभाव वेगाने भारतात पसरवला आहे. यासह कंपनीचा असाही दावा आहे की, स्पुतनिक व्हीने आतापर्यंत या सर्व स्ट्रेनबाबत त्यांचे परिणाम जाहीर केले आहेत.

अशी असणार Sputnik V लसीची किंमत

केंद्र सरकारच्या नवीनतम मूल्य निर्धारणाच्या नियमांनुसार, Sputnik V लसीची किंमत १ हजार १४५ रुपये असणार आहे. ज्यात रुग्णालयाचे शुल्क आणि कराचा समावेश असणार आहे. याआधीही अपोलो रुग्णालयात लसी देण्यात आल्या. त्या लसींच्या एका डोसची किंमत १ हजार २५० रुपये इतकी होती. पुढील काळात लसींच्या किंमती कमी केल्या जातील असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

अपोलो रुग्णालयासोबतच मधुकर रेनबो चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्येही Sputnik Vलस उपलब्ध होणार आहे. Sputnik V लस घेण्यासाठी नागरिकांना पहिल्यांदा कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. Sputnik Vलसीला देशात आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर भारतात डॉ. रेड्डीज लॅबरोटेरिज Sputnik Vलसीचे उत्पादन करत आहे. हैद्राबाद आणि विशाकापट्टणम येथील प्लॅटमध्ये ही लस तयार करण्यात येत आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -