घरदेश-विदेशपाकच्या काश्मीरवरील अजेंड्याला पाठिंबा; Hyundai, Pizza Hut नंतर आता KFC ची वादग्रस्त...

पाकच्या काश्मीरवरील अजेंड्याला पाठिंबा; Hyundai, Pizza Hut नंतर आता KFC ची वादग्रस्त पोस्ट, युजर्सचा संताप

Subscribe

काश्मीरबाबत पाकिस्तानच्या घाणेरड्या विचारसरणीचे समर्थन करणाऱ्या या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सबद्दल भारतातील लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर लोक नाराजी व्यक्त करत लोकं ट्विटरवर #BoycottKFC ट्रेंड करत आहे.

पाकिस्तानच्या भारतविरोधी काश्मीर मुद्द्यावरील अजेंड्याला पाठिंबा देणाऱ्या आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या यादीत आणखी एक नावाचा समावेश झाला आहे. Hyundai , Pizza Hut नंतर आता KFC ने देखील काश्मीरबाबत पाकिस्तानच्या घाणेरड्या विचारसरणीचे समर्थन केले आहे.

काश्मीर स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरील समर्थन पोस्ट समोर आल्यानंतर भारतात केएफसीला विरोध केला जातोय. यानंतर आता KFC इंडियाने ट्विट करत याबाबत जाहीर माफी मागितली आहे, परंतु सोशल मीडियावर भारतीय युजर्स या आंतरराष्ट्रीय ब्राँड्सच्या कृतीवर तीव्र संताप व्यक्त करतायत. या आंतरराष्ट्रीय ब्राँड्सकडून पाकिस्तानच्या भारतविरोधी अजेंडाला पाठींबा दिला जात आहे.

- Advertisement -

काश्मीरवर पाकिस्तानच्या अजेंड्याला पाठिंबा देत KFC ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये काश्मीर काश्मिरी लोकांचे आहे असे लिहिले होते. पिझ्झा हट पाकिस्तानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करताना लिहिले की, काश्मीर एकता दिनानिमित्त, “आम्ही सर्व काश्मिरी बंधू आणि भगिनींच्या स्वातंत्र्यासाठी एकत्र उभे आहोत.”

पाकच्या काश्मीरवरील अजेंड्याला पाठिंबा; Hyundai, Pizza Hut नंतर आता KFC ची वादग्रस्त पोस्ट, युजर्सचा संताप
पाकच्या काश्मीरवरील अजेंड्याला पाठिंबा; Hyundai, Pizza Hut नंतर आता KFC ची वादग्रस्त पोस्ट, युजर्सचा संताप

ट्विटरवर KFC इंडियाच्या अधिकृत अकाऊंटवरून प्रसिद्ध झालेल्या मेसेजमध्ये असे लिहिले आहे की, देशाबाहेरील KFC च्या काही सोशल मीडिया चॅनेलवर प्रकाशित झालेल्या पोस्टबद्दल आम्ही मनापासून माफी मागतो. आम्ही भारताचा आदर करतो आणि सर्व भारतीयांची अभिमानाने सेवा करण्याच्या आमच्या संकल्पासाठी वचनबद्ध आहोत.

- Advertisement -

ह्युंदाई पाकिस्तानने काश्मीरबाबत भारतविरोधी ट्विटही केले होते, ज्यानंतर या नव्या वादाला सुरुवात झाले. ह्युंदाई पाकिस्तानने त्या पोस्टमध्ये लिहिले की, “आपण काश्मिरी बांधवांच्या बलिदानाचे स्मरण करू आणि त्यांना पाठिंबा देऊ या जेणेकरून ते स्वातंत्र्यासाठी लढत राहतील.” यानंतर भारतातील ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदाईला मोठा विरोध झाला. यानंतर ह्युंदाई इंडियाने या प्रकरणावर स्पष्टीकरण देत जाहीर माफी मागितली आहे. यावेळी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही ह्युंदाईने भारतीयांची बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली.

काश्मीरबाबत पाकिस्तानच्या घाणेरड्या विचारसरणीचे समर्थन करणाऱ्या या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सबद्दल भारतातील लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर लोक नाराजी व्यक्त करत लोकं ट्विटरवर #BoycottKFC ट्रेंड करत आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -