Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश महाराष्ट्रानंतर आता कर्नाटकातही वाहतायेत सत्तांतराचे वारे! दावे-प्रतिदाव्यांना आला वेग

महाराष्ट्रानंतर आता कर्नाटकातही वाहतायेत सत्तांतराचे वारे! दावे-प्रतिदाव्यांना आला वेग

Subscribe

नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापन होऊन 4 महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी अद्याप विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती झालेली नाही. कर्नाटकात भाजपा हा प्रमुख विरोधी पक्ष आहे, मात्र त्यांनी अद्याप विरोधी पक्षनेत्याची घोषणा केलेली नाही. याचपार्श्वभूमीवर भाजपाचे (BJP) ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील (Basangowda Patil) यांनी मोठा दावा केला आहे. (After Maharashtra now the winds of power change are blowing in Karnataka too Claims and counter claims gathered pace)

माध्यमांशी बोलताना बसनागौडा पाटील यांना विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीबाबत विचारले असता ते म्हणाले की, काँग्रेसचे 45 आमदार आमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत, असा दावा करत आम्ही मुख्यमंत्री होणार असताना विरोधी पक्षनेतेपद का बसवायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा – Parliament Special Session : सुप्रिया सुळेंकडून पंतप्रधानाच्या भाषणाचे कौतुक; पण…

काँग्रेस नेते बी.के.हरीप्रसाद यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा उपस्थित करत बसनागौडा पाटील यांनी म्हटले की, हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे, पण बीके हरीप्रसाद यांच्या ज्येष्ठतेला त्यांनी महत्त्व दिलेले नाही. या सर्व घडामोडी बघता हे सरकार जानेवारीनंतर चालणार नाही, असे म्हणत 45 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे पुन्हा एकदा म्हटले. भाजपा आमदाराच्या वक्तव्यावरून कर्नाटकात सर्व काही सुरळीत होत नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कर्नाटकात आणखी तीन उपमुख्यमंत्री करण्याची मागणी

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात आणखी तीन उपमुख्यमंत्री करण्याची मागणी होताना दिसत आहे. कर्नाटकात अल्पसंख्याक, एससी, एसटी आणि लिंगायत समाजातील प्रत्येकी एका नेत्याला उपमुख्यमंत्री करण्याची मागणी काँग्रेसच्या एका नेत्याने केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – Parliament Special Session : प्रबळ विरोधकांना ईडीमार्फत कमकुवत करण्याचा प्रयत्न; सरकारवर आरोप

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि जीडीएस युती?

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा आणि जेडीएसमध्ये युती होऊ शकते, अशी चर्चा कर्नाटकात सध्या सुरू आहे. भाजपा पुढील लोकसभा निवडणुका GDS सोबत मिळून लढवेल आणि भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानेही लोकसभेच्या चार जागा देण्याचे मान्य केले असल्याचे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांनी 8 सप्टेंबर रोजी सांगितले होते. मात्र कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जीडीएस नेते कुमारस्वामी यांनी युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, आमच्यात अद्याप युती झालेली नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्ष एकत्र येण्याची गरज आहे की नाही, हे नंतर पाहू. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना म्हटले की, काँग्रेस राज्याची लूट करत असून लोकांना पर्याय हवा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -