घरदेश-विदेशMukhtar Ansari : मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ म्हणतो - कहानी खत्म...

Mukhtar Ansari : मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ म्हणतो – कहानी खत्म नहीं हुई, शुरू हुई है…

Subscribe

नवी दिल्ली : बांदा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गँगस्टर मुख्तार अंसारी याचा गुरुवारी (ता. 28 मार्च) संध्याकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. परंतु, अन्सारी याच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या मुलाकडून आणि भाऊ अफझाल अन्सारी यांच्याकडून करण्यात आला आहे. यानंतर आता पुन्हा मुख्तार अन्सारी याचा भाऊ अफझाल अन्सारी याने केलेल्या एका वक्तव्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. कहानी खत्म नहीं हुई, शुरू हुई है…, असे विधान अफजल अन्सारी याने केल्याने त्याला नेमके काय बोलायचे आहे, असा प्रश्ना निर्माण झाला आहे. (After Mukhtar Ansari death, brother Afzal Ansari issued a threat)

हेही वाचा… Gangster Mukhtar Ansari : आजोबा स्वातंत्र्य सैनिक, काका उपराष्ट्रपती; अशी आहे गँगस्टर मुख्तार अंसारीच्या कुटुंबाची हिस्ट्री

- Advertisement -

मुख्तार अन्सारीसोबत अन्याय झाल्याचे अफजल अन्सारी याच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला न मानता मुख्तारला आयसीयूमधून जेलमध्ये पाठवल्याच्या आरोप अफजलने केला आहे. आयसीयूतून थेट जेलमध्ये कोणाला पाठवले जात नाही. वॉर्डात ऑब्झर्वेशनसाठी ठेवले जाते. परंतु, मुख्तारसोबत करण्यात आले नाही, असा आरोपही अफजल अन्सारी याच्याकडून करण्यात आला आहे.

तर, प्रसार माध्यमांशी बोलताना अफजल अन्सारी याने सांगितले की, मृत्यूच्या काही तास अगोदर मुख्तार अन्सारीचे मुलगा उमर अन्सारी आणि सुन निखत यांच्यासोबत बोलणे झाले होते. त्यांच्यातील झालेल्या संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो ऐका. व्हिडीओमध्ये मुख्तार स्पष्टपणे म्हणतोय की, 10 दिवसांपासून न मोशन झाले न लघुशंका. स्वतःहून उठता-बसताही येत नाही. आयसीयूमधून थेट जेलमध्ये पाठवणारा डॉक्टर म्हणतोय की, त्याची प्रकृती ठीक आहे. जर प्रकृती ठीक होती तर 24 तासांमध्ये मृत्यू कसा झाला? असा प्रश्नही अफजल अन्सारी याच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.

- Advertisement -

त्यामुळे आता संतापलेल्या मुख्तारी अन्सारी याच्या भावाने म्हटले की, मुख्तार अन्सारीच्या मृतदेहाला अशा पद्धतीने दफण करण्यात आलेले आहे की तो मृतदेह पाच-दहा वर्षांनंतर तपासणी करायचे म्हटले तरी तो कबरीतून बाहेर काढता येऊ शकेल. त्यामुळे मुख्तारची कहाणी संपलेली नाही, आता सुरू झाली आहे. जेलमध्ये टाकल्यानंतर त्यांच्याविरोधात 50 खटले दाखल केले आहेत, ही अन्यायाची परिसिमा आहे, असे सांगत अफजल अन्सारी याने आपला राग व्यक्त केला आहे.

तसेच, मुख्तार अन्सारीचा मृत्यू नियोजित हत्या आहे. मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर, जेलमधील डॉक्टर, जेल प्रशासन, सरकारकडून साध्या ड्रेसवर असलेले एलआययू आणि एसटीएफचे लोक, यांनी पूर्ण नियोजन करुन मुख्तारची हत्या केली आहे, असा थेट आरोपच अफजल अन्सारी याने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -