घरदेश-विदेश३० वर्षांपूर्वी निधन झालेल्या माझ्या वडिलांना राजकारणात कशाला खेचता? - मोदी

३० वर्षांपूर्वी निधन झालेल्या माझ्या वडिलांना राजकारणात कशाला खेचता? – मोदी

Subscribe

निवडणूक जवळ आली की, प्रचारसभांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या घटणा नेहमीच घडताना दिसत असतात. साधारणत: हे आरोप-प्रत्यारोप दोन पक्षांपक्षांमध्ये असणं अपेक्षित असते. परंतु, सध्या देशातील राजकीय वातावरण हे अंत्यंत गलिच्छ बघायला मिळत आहे.

कॉंग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांनी भर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वडिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वादग्रस्त विधानाला मोदी यांनी मुत्तेमवार आणि कॉंग्रेसला धारेवर धरले आहे. शिवाय, ३० वर्षांपूर्वी निधन झालेल्या माझ्या वडिलांना राजकारणात का ओढत आहात? असा सवाल त्यांनी केला आहे. सध्या देशातील पाच राज्यांमध्ये विधानभा निवडणूकीचे वातावरण आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मोदी यांची मध्य प्रदेशच्या विदिशा या ठिकाणी प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेत त्यांनी मुत्तेमवार यांच्या वक्तव्याला उत्तर दिले आहे.

हेही वाचा – माझ्या आईला राजकारणात का खेचता – नरेंद्र मोदी

- Advertisement -

काय म्हणाले मोदी?

नरेंद्र मोदी म्हणाले की, माझे आई-वडील यांची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझे कुटुंबीयांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. तरीही तुम्ही ३० वर्षांपूर्वी निधन झालेल्या माझ्या वडिलांना राजकारणात का ओढत आहात? असा सवाल त्यांनी केला आहे. शिवाय, राहुल गांधी यांच्याविषयी बोलताना म्हणाले की, राहुल गांधी आणि सोनिया गांधी दोन्ही राजकारणात आहेत. जर माझे वडिल राजकारणात असते तर त्यांना वडिलांविषयी बोलण्याचा अधिकार होता, असे मोदी म्हणाले आहेत. कॉंग्रेसच्या नेत्यांना राहुल गांधी प्रोत्साहन देत असल्यामुळे या गोष्टी घडत असल्याचे मोदी म्हणाले आहेत.

हेही वाचा – काँग्रेसला भांडणं लावल्याशिवाय चैन पडत नाही – नरेंद्र मोदी

- Advertisement -

देशातील राजकारणाची पातळी खालावली

निवडणूक जवळ आली की, प्रचारसभांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या घटणा नेहमीच घडताना दिसत असतात. साधारणत: हे आरोप-प्रत्यारोप दोन पक्षांपक्षांमध्ये असणं अपेक्षित असते. परंतु, सध्या देशातील राजकीय वातावरण हे अंत्यंत गलिच्छ बघायला मिळत आहे. या राजकारणात आता वैयक्तीक टीका केली जात आहे. भर सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई-वडिलांविषयी बोलले जात आहे. त्यामुळे देशातील राजकारण किती खालच्या थरावर जाऊन पोहोचले आहे, याची परिचीती देशातील नागरिकांना होत आहे.


हेही वाचा – पंतप्रधानपदासाठी कुणाला पसंती, राहुल गांधी की नरेंद्र मोदी?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -