घरट्रेंडिंगकायद्यात संशोधनाची गरज आहे - उज्वल निकम

कायद्यात संशोधनाची गरज आहे – उज्वल निकम

Subscribe

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणी चारही दोषींना आज तिहार तुरुंगात फाशी दिली गेली. तिहार तुरुंगात एकाचवेळी चार जणांना फासावर चढविण्याची ही पहिलीच घटना आहे. तिहारच्या तुरुंगाच्या क्रमांक तीनमध्ये आज ही फाशी दिली गेली. फाशीसाठी बिहारच्या बक्सरमधून दोर मागवण्यात आले होते. दोषींना फाशी देण्याचा पाच मार्च रोजी चौथे ‘डेथ ‌वॉरंट’ काढताना न्यायालयाने २० मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता फाशीची वेळ निश्चित केली होती. आरोपींच्या फाशीनंतर देशात आनंदाच वातावरण आहे. उशीर झाला पण न्याय झाला असा एकच विचार सगळ्यांच्या मनात आहे. “आज आमचा विजय आहे , माझ्या मुलीला न्याय मिळाला अशी प्रतिक्रीया निर्भयाच्या आई -वडिलांनी दिली. तर सरकारी वकील उज्वल निकम यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे.

निर्भयाबरोबर संपूर्ण समाजाला न्याय मिळाला. कारण ज्या पद्धतीने निर्भयाचा खून आणि अत्याचार करण्यात आले ही घटना दुर्मिळातील दुर्मीळ आहे. कोणीही अशा हिंस्त्र पध्दतीने वागू नये असे अरोपी निर्भयाबरोबर वागले होते. त्यामुळे त्यांना अशी फाशीची शिक्षा मिळणे क्रमप्राप्त होतं. आणि ती मिळाली याचा आनंद प्रत्येकालाच आहे. कठोर शिक्षा जेव्हा देतो तेव्हा ती केवळ गुन्हेगारासाठी नाही तर समाजातील अशा प्रत्येकासाठी असते जे अशा कृत्याचा विचार करतात. कायद्यामध्ये संशोधनाची गरज आहे.जर कोणी कायद्याशी खेळतं किंवा चॅलेंज करतं ते चुकीचं आहे. लोकांमध्ये कायद्याप्रती विश्वास निर्माण झाला पाहिजे. एखादी याचिका कितीवेळा केली पाहिजे यावर विचार झाला पाहिजे. रिव्ह्यू पिटीशनसाठीही मर्यादा असायला हवी,आरोपींच्या वकिलांनी कायद्याची थट्टा केली,हे गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन आहे. लोकांचा कायद्यावरून विश्वास उडू नये यासाठी कायद्यात संशोधनाची गरज आहे. कारण या प्रकरणात आरोपींच्या वकिलांनी कायद्याचा गैरवापर केला. तो लक्षात घेता आता कायद्यात बदल होण्याची गरज आहे.  असं मत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं.

अशी होते फाशीची शिक्षा

फाशीच्या एक तास आधी दोषीला अंघोळ करण्यास सांगितले जाते. त्यानंतर त्याला नवे कपडे दिले जातात. कोठडीतून बाहेर पडल्यानंतर त्याचा चेहरा काळ्या कापडाने झाकला जातो. दोन्ही हात मागे बांधले जातात. ज्या ठिकाणी फासावर लटवले जाणार आहे तिथे नेले जाते. त्याच्या भावना जाणून घेतल्या जातात. ही प्रक्रिया सुरू असते तेव्हा कारागृहातल्या अन्य कैद्यांना कोठडीतच ठेवले जाते. त्यांना बाहेर येण्यास मनाई असते.

- Advertisement -

फाशी प्रक्रियेसाठी यांची उपस्थितीत असते

फाशी देताना तुरुंग अधीक्षक आणि उपअधीक्षकांची उपस्थिती अनिवार्य असते. त्यांच्यासोबत वैद्यकीय अधिकारी उपस्थित असतो. प्रत्यक्ष फाशी देताना नातेवाईकांना उपस्थित राहण्यास मनाई असते. संशोधक, मनोवैज्ञानिक यावेळी तुरुंग अधिक्षकांच्या परवानगीने उपस्थित राहू शकतात. जल्लादाच्या साहाय्याने फाशी दिली जाते. आदेश येताच संदुक ओढला जातो व आरोपीला फासावर लटकवण्यात येते. हा मृतदेह जवळपास अर्धा तास तशाच स्थितीत लटकवण्यात येतो. त्यानंतर खाली उतरवून त्याची तपासणी वैद्यकीय अधिका-यांमार्फत होते. तो मृत झाल्याची खात्री केल्यानंतर मृतदेह कैद्याच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -