घरदेश-विदेशउत्तर कोरियाने 10 क्षेपणास्त्रांचा मारा केल्यानंतर दक्षिण कोरियाने दिला हवाई हल्ल्याचा इशारा

उत्तर कोरियाने 10 क्षेपणास्त्रांचा मारा केल्यानंतर दक्षिण कोरियाने दिला हवाई हल्ल्याचा इशारा

Subscribe

उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागल्यानंतर दक्षिण कोरियाचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफने एक निवेदन जारी केले.

दक्षिण कोरियासोबत (south korea) अमेरिकेच्या संयुक्त लष्करी सरावावर टीका झाल्यानंतर उत्तर कोरियाने (north korea) बुधवारी एकामागून एक 10 क्षेपणास्त्रांचा मारा केला. यातील एक क्षेपणास्त्र दक्षिण कोरियाजवळ पडले आहे. क्षेपणास्त्र डागल्यानंतर दक्षिण कोरियावरचा तणाव वाढला आहे. दक्षिण कोरियाने आपल्या पूर्वेकडील बेटावर हवाई हल्ल्याचा इशारा दिला आहे.

संयुक्त लष्करी सरावावर टीका
याआधी उत्तर कोरियाने दक्षिण कोरियासोबतच्या (south korea) अमेरिकेच्या (america) संयुक्त लष्करी सरावावर टीका केली होती. उत्तर कोरियाने दक्षिण कोरिया आणि अमेरिकेलाही गंभीर परिणाम भोगण्याची धमकी देण्यात आली आहे. उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागल्यानंतर दक्षिण कोरियाचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफने एक निवेदन जारी केले. निवेदनात म्हटले आहे की, उत्तर कोरियाने बुधवारी सकाळी वोनसानच्या पूर्व किनारपट्टी भागातून क्षेपणास्त्रांचा मारा केला.

- Advertisement -

हवाई हल्ल्याचा इशारा दिला
निवेदनात असेही म्हटले आहे की दक्षिण कोरियाच्या (south korea) पूर्व सागरी सीमेच्या दक्षिणेस 26 किमी अंतरावर एक क्षेपणास्त्र पाण्यात पडले होते. याशिवाय हे क्षेपणास्त्र उलुंग बेटाच्या उत्तर-पश्चिम 167 किमी परिसरातही पडले आहे. दक्षिण कोरियाने उल्लुंग बेटावर हवाई हल्ल्याचा इशारा दिला असल्याचे सांगितले.

दक्षिण कोरियाचा रोख
उत्तर कोरियाने जे केले खपवून घेतले जाणार नाही, असे दक्षिण कोरियाने (south korea) म्हटले आहे. अमेरिकेशी समन्वय साधून यावर कडक कारवाई केली जाईल. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर दक्षिण कोरियाने उत्तर कोरियावर रोख ठेवते असे म्हटले.

- Advertisement -

दरम्यान एफपी वृत्त संस्थेने म्हटल्याप्रमाणे उत्तर कोरियाच्या सकाळच्या प्रक्षेपणाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाच्या सैन्याने हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या तीन क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे.

अमेरिका आणि दक्षिण कोरियाला समज
उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला समज दिली की ते देखील योग्य उत्तर देण्यासाठी अधिक योजना करत आहेत. अमेरिका आणि दक्षिण कोरियाला मोठी किंमत मोजवी लागेल याच सोबत अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकीही उत्तर कोरियाने दिली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाने संयुक्तपणे 200 हून अधिक शस्त्रास्त्रांसह लष्करी सराव केल्यानंतर उत्तर कोरियाचे (north korea) हे वक्तव्य केले आहे.

उत्तर कोरियाने 40 हून अधिक क्षेपणास्त्र चाचण्या केल्या
उत्तर कोरियाने यावर्षी 40 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या आहेत. या क्षेपणास्त्रांमध्ये विकसित केलेले क्षेपणास्त्र आणि जपानच्या दिशेने डागलेल्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा समावेश आहे.


हे ही वाचा –  पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातून आलेल्या ‘या’ अल्पसंख्यकांना भारतीय नागरिकत्व

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -