घरदेश-विदेशखासदारकी गेली...राहुल गांधी होणार बेघर?

खासदारकी गेली…राहुल गांधी होणार बेघर?

Subscribe

राहुल गांधींवर झालेल्या या कारवाईनंतर ते बेघर होणार का? यावर जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. सुरत न्यायालयाने त्यांना काल दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या अडचणीत आणखी वाढ होणार असं चित्र दिसतंय. कारण राहुल गांधींवर झालेल्या या कारवाईनंतर ते बेघर होणार का? यावर जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

छत्तीसगडमधील नवा रायपूर येथे काँग्रेसच्या ८५ व्या राष्ट्रीय अधिवेशनात राहुल गांधी त्यांचं घर आणि आई सोनिया गांधी यांच्या आठवणी सांगताना मोठा खुलासा केला होता. ५२ वर्षांचा असूनही आपल्या नावावर आजही घर नाही असं राहुल गांधी यांनी त्यावेळी म्हटलं होतं. राहुल गांधींनी केलेल्या विधानावरुन त्यावेळी भारतीय जनता पार्टीने त्यांना घेरण्याचा प्रयत्न सुद्धा केला.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी नुकतीच भारत जोडो यात्रा केली होती. यावेळी चे एकूण १५० दिवस कंटेनरमध्ये घरासारख्या बनवलेल्या एका केबिनमध्ये राहिले होते. या कंटेनरमध्ये झोपण्यासाठी बेड, टॉयलेट आणि काहींमध्ये एसीही लावण्यात आले होते. याशिवाय डब्यातच झोपण्यासाठी गाद्या, स्वच्छतागृहेही करण्यात आली होती.

राहुल गांधी पुढील 150 दिवस अज्ञात राहतील. किंवा बेड, टॉयलेट आणि काही डब्यात झोपण्यासाठी समान दिवे आहेत. स्थलांतरादरम्यान अनेक भागात तापमान आणि उष्मा वाढेल, ३५७० किमीच्या स्थलांतरात असे अनेक भाग आहेत जिथे प्रचंड उष्णता आणि आर्द्रता असेल… त्यामुळेच अशी व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय झोपण्यासाठी पलंग, स्वच्छतागृहेही करण्यात आली आहेत.

- Advertisement -

राहुल गांधी हे सध्या दिल्लीतील ल्युटेन्स झोनमधील १२ तुगलक रोड इथे राहत आहेत. लोकसभा खासदार असल्याने राहुल गांधींना इथे सरकारी बंगला राहण्यासाठी दिला होता. या प्रकारच्या बंगल्यात सात खोल्या, घरगुती मदतनीसांसाठी स्वतंत्र क्वार्टर देखील असतात. परंतू आता राहुल गांधी यांचं खासदार पदच रद्द झाल्यानं ते बेघर होणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण राहुल गांधी यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्यानुसार राहुल गांधी याचं कोणतंच स्वतःच घर नाही. त्यात त्यांची आई सोनिया गांधी यांचं कोणतं घर नाही. अलहाबादमध्ये त्यांचं वडिलोपर्जित घर आहे. पण ते आमचं नाहीये, असं देखील राहुल गांधींनी सांगितलं होतं. त्यात आता खासदारकी रद्द झाल्यानं राहता सरकारी बंगला देखील रिकामा करावा लागणार आहे. त्यामुळे आता राहुल गांधी कुठे राहणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

देशातील कोणत्याही सक्षम न्यायालयाने कुणाही लोकप्रतिनिधीला किमान दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यावर त्याचं संसद सदस्यत्व त्याचक्षणी रद्द होईल असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याचाच आधार घेऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -