दारूसाठी नाही तर लोकांनी आता लावल्या तंबाखू घेण्यासाठी लांबच लांब रांगा!

लॉकडाऊन ३ सुरू झाल्यावर दारू विक्रीला सरकारने परवानगी दिली होती. त्यानंतर दुकानासमोर लांबच लांब रांगा लागल्या. त्यानंतर होणारी गर्दी बघता सरकारने ऑनलाईन दारू विक्रीचा निर्णय घेतला. पण सुरतमध्ये पुन्हा अशीच काहीशी दृश्य दिसत आहेत. पण ही रांग दारूसाठी नाहीतर तंबाखूसाठी लावण्यात आली आहे. तंबाखूसाठी भर उन्हात लोकांनी रांगा लावल्या आहेत.

दिनेश हा असाच एक ग्राहक आहे. तंबाखूच्या खरेदीसाठी लांब पट्ट्यात उभा असलेला दिनेश म्हणतो, ‘कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन झाला होता त्यामुळे मला किंवा माझ्या वडिलांना कोठूनही तंबाखू मिळू शकला नाही. तंबाखू खरेदी करण्यासाठी गेले एक तास लाइनमध्ये उभा आहे.

मला वाटतं की लॉकडाऊनमुळे दुकानं बंद होती. त्यामुळे ग्राहकांना तंबाखू मिळाले नाही. लॉकडाऊनच्या काळात मला अनेक फोन यायचे. कधीकधीतर मला फोन स्विच ऑफ करायला लागायचा. ज्यांना माझ्या घराचा पत्ता मिळाला ते सरळ घरी आले. असे सुरत मधील एका तंबाखू विकणाऱ्याने सांगितले.

देशात दारू विक्रीला परवानगी दिली असताना असेच काहीसे चित्र दिसले होते. अनेक तास लोकं दारूच्या दुकानांसमोर उभे राहिले.  त्यानंतर अनेक राज्यात गर्दी होऊ नये म्हणून होम डिलिव्हरीची सुविधादेखील सुरू झाली. आता दारू नंतर लोकांनी तंबाखूसाठी गर्दी केली आहे.


हे ही वाचा – घटस्फोटीत महिलेवर तो करायचा बलात्कार, ‘लग्न करूयात’ म्हटल्यावर केला खून!