घरताज्या घडामोडीशालेय मुलीच्या मृत्यूनंतर तामिळनाडूत जाळपोळ, आंदोलकांवर होणार कारवाई

शालेय मुलीच्या मृत्यूनंतर तामिळनाडूत जाळपोळ, आंदोलकांवर होणार कारवाई

Subscribe

बारावीच्या विद्यार्थीनीच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने शाळेत घुसून तोडफोड केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूत घडली. रविवारी सकाळच्या सुमारास तामिळनाडूतील कल्लाकुरिची येथे ही घटना घडली.

बारावीच्या विद्यार्थीनीच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने शाळेत घुसून तोडफोड केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूत घडली. रविवारी सकाळच्या सुमारास तामिळनाडूतील कल्लाकुरिची येथे ही घटना घडली. इतकेच नव्हे तर, स्कूल बसेसही जाळण्यात आल्या आहेत. (after student suicide tamilnadu kallakurichi protesters and burn school buses throw stones on police)

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती तामिळनाडूच्या डीजीपींनी दिली आहे. शिवाय, शाळकरी मुलीचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचे सांगितले.

- Advertisement -

नेमके प्रकरण काय?

कल्लाकुरिची जिल्ह्यातील चिन्ना सेलम येथील एका खासगी उच्च माध्यमिक शाळेतील बारावीच्या विद्यार्थिनीने मंगळवारी रात्री शिक्षकांवर छळाचा आरोप करून आत्महत्या केली. वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत राहणाऱ्या या तरुणीने वरच्या मजल्यावरून जमिनीवर उडी घेऊन जीवन संपवले आहे.

- Advertisement -

पोलिसांचा बंदोबस्त

रविवारी आंदोलनासाठी जमाव शाळेत पोहोचला होता. हा जमाव थांबण्यासाठी आणि कोणतीही हिंसक घटना न होण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. मात्र तरीही मोठ्या संख्येने लोक तेथे पोहोचले. लोकांनी हिंसक स्वरुपात आंदोलन केले. पोलिसांनी लाठीमार करून त्यांना पळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ५०० पोलीसही घटनास्थळी पाठवण्यात आल्याची माहिती मिळते.

मृत मुलीच्या शवविच्छेदन अहवालानुसार, तिच्या मृत्यूपूर्वी तिला जखमा झाल्या होत्या. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. तिच्या मृत्यूमुळे धक्का बसलेले तिचे आई-वडील, नातेवाईक आणि कुड्डालोर जिल्ह्यातील वेप्पूर येथील पेरियानासलूर या गावातील लोक न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.

सर्व आरोपींवर कारवाई होणार

या घटनेचे व्हिडिओ असून, शाळेवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, सध्या मृत मुलीचे शवविच्छेदन (Post mortem) व्हावे यासाठी तिच्या पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.


हेही वाचा – चिंताजनक! राज्यात 2 हजार 186 नवे कोरोनारुग्ण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -