घरताज्या घडामोडीआम्रपाली ग्रुपचे रखडलेले प्रकल्प पूर्ण होणार, 7 बँका देणार 1500 कोटींचे कर्ज

आम्रपाली ग्रुपचे रखडलेले प्रकल्प पूर्ण होणार, 7 बँका देणार 1500 कोटींचे कर्ज

Subscribe

आम्रपाली ग्रुपचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यानंतर 7 बँकांचा समूह आम्रपाली ग्रुपला 1500 कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे. या पैशांतून रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम क्षेत्रातील एनबीसीसीने आम्रपाली स्टॉल्ड प्रोजेक्ट्स एंड इनवेस्टमेंट रिकंस्ट्रक्शन एस्टैब्लिशमेंट (एएसपीआईआरई) अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखेअंतर्गत आम्रपालीचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली आहे.

उच्च न्यायालयाने 28 मार्चला बँक ऑफ बडोदा नेतृत्व करत असलेल्या 7 बँकेच्या ग्रुपने आम्रपाली ग्रुपच्या रखडलेल्या प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी 1500 कोटी रुपये वितरण करण्याबाबत निर्देश दिले होते. एनबीसीसीने म्हटलं आहे की, 29 मार्चला एएसपीआईआरई आणि बँकांच्या समुहामध्ये आम्रपालीच्या रखडलेल्या प्रकल्पांसाठी 1500 करोड रुपयांचे कर्ज वितरण करण्याबाबत एक करार झाला आहे.

- Advertisement -

बँकांच्या या ग्रुपमध्ये बँक ऑफ बडोदा, इंडिया बँक, युको बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब एंड सिंध बँकेचा समावेश आहे. एसबीसीसीने पुढे म्हटलं आहे की, आपल्या स्वप्नातील घराची प्रतिक्षा करणाऱ्या 40,000 गृह खरेदीदारांना याचा पहिला लाभ होईल.


हेही वाचा : कडक उन्हामुळे गंगा नदीत वाढले वाळूचे ढिगारे, शास्त्रज्ञांच्या चिंतेत वाढ

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -