घरताज्या घडामोडीसुवर्ण मंदिर नंतर कपूरथलामध्ये निशान साहीबचा अवमान करणाऱ्याची जमावाकडून हत्या

सुवर्ण मंदिर नंतर कपूरथलामध्ये निशान साहीबचा अवमान करणाऱ्याची जमावाकडून हत्या

Subscribe

अमृतसर मधील सुवर्ण मंदिरात शनिवारी गुरु ग्रंथ साहीबचा अवमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कपूरथला येथील निजामपूर येथे आज रविवारी निशान साहीबचा अवमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा हिंसक जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अमृतसरमध्ये एकापाठोपाठ एक या घटना घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापार्श्वभूमीवर कपूरथला गुरुद्वारा तर्फे घोषणा करण्यात आली आहे. यात याप्रकरणात पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी हस्तक्षेप करु नये असे सांगण्यात आले आहे. यादोन्ही घटनांसाठी पंजाब पोलीस आणि राज्य सरकारचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला असून शीख नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र यावे असे आवाहन गुरुद्वारा कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisement -

नेमके काय आहे प्रकरण?
बाबा अमरजीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ४ वाजता एक व्यक्ती अचानक दरबार हॉलमध्ये आला. त्याने गुरु साहीबचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला त्यानंतर संबंधित व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला जमावाने पकडले आणि त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या गुरद्वाराजवळ पोलीस चौकी असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी व्यक्तीचा ताबा द्यावा अशी विनंती पोलिसांनी जमावाला केली. पण जमाव काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानंतर शिरोमणी गुरुद्वारा  कमिटीच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत जमावाच्या मारहाणीत संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे संबंधित आरोपीने सिलेंडर चोरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -