घरदेश-विदेशISRO: मंगळ, चंद्र आणि सूर्यानंतर आता इस्रोची झेप शुक्राकडे; 2024 ला शुक्रयान...

ISRO: मंगळ, चंद्र आणि सूर्यानंतर आता इस्रोची झेप शुक्राकडे; 2024 ला शुक्रयान मोहीम

Subscribe

भारताची चांद्रयान-3 मोहीम प्रचंड यशस्वी झाल्यानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO)प्रमुख डॉक्टर एस सोमनाथ यांनी आता शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्याचा संकल्प सोडला आहे.

भारताची चांद्रयान-3 मोहीम प्रचंड यशस्वी झाल्यानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO)प्रमुख डॉक्टर एस सोमनाथ यांनी आता शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्याचा संकल्प सोडला आहे. शुक्र ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम आहे. शुक्र ग्रहावर वातावरणाचा दबाव पृथ्वीच्या 100 पट जास्त आहे. डॉक्टर एस. सोमनाथ इंडियन नॅशनल सायन्स अकादमी येथे लेक्चर देत असताना त्यांनी ही घोषणा केली आहे. (After the huge success of India Chandrayaan 3 ission Indian Space Research Organization ISRO chief Dr S Somnath has now given up on studying Venus)

शुक्र ग्रहाची अनेक रहस्य अद्याप मानवाला माहिती नाहीत. शुक्रावर सभोवतीली ढगांचे आवरण असून त्यात एसिड भरलेले आहे. त्यामुळे कोणतेही स्पेसक्राफ्ट त्याच्या वातावरणाचा थर भेदून आत जाऊ शकत नाही, शुक्र ग्रहाच्या निर्मितीबाबत माहिती मिळवण्यासाठी त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे.

- Advertisement -

शुक्र आणि मंगळ ग्रहाचा अभ्यास केला असता तेथे जीवन का नाही? याचा उलगडा होतो. त्याचा अजूनही सखोल अभ्यास करण्यासाठी तेथे मोहीम आखण्याची गरज आहे. सोमनाथ यांच्या या वक्तव्यापूर्वी इस्रोच्या एका संशोधकाने दावा केला होता की, शुक्रयान मोहिमेला उशीर होऊ शकतो. या संदर्भात एका संशोधकाने म्हटले होते की जर वेळेत परवानगी मिळाली नाही तर पुढच्या वर्षी 2024 ला हे शुक्रयान मिशन लाँच होऊ शकणार नाही. जर पुढच्या वर्षानंतर सर्वात चांगली संधी सात वर्षांनंतर म्हणजे 2031 साली मिळेल. शुक्रयान ही शुक्र ग्रहावरील देशाची पहिली मोहिम आहे.

(हेही वाचा: गेल्या नऊ वर्षांत असा एकही दिवस गेला नाही… ठाकरे गटाचे पंतप्रधान मोदींवर शरसंधान )

- Advertisement -

गगनयान भारताची सर्वात मोठी मोहीम

इस्रोकडून गगनयान मोहिमेची तयारीही सुरू आहे. भारताच्या मानवी अंतराळ मोहीमेला गगनयान असं नाव देण्यात आलं आहे. गगनयान मोहिम इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल. या मोहिमेमध्ये अंतराळवीर पाठवण्याची तयारी सुरू आहे. या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेअंतर्गत तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -