कर्नाटकात काँग्रेसच्या मोठ्या आघाडीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

"फोडाफोडी आणि खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही", अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक विधानसभा निकालानंतर दिली आहे.

संग्रहित छायाचित्र

मुंबई | “फोडाफोडी आणि खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कर्नाटक विधानसभा निकालानंतर (Karnataka Election Result 2023) दिली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात कॉंग्रेस आघाडीवर आहे. आतापर्यंत कॉंग्रेसचे ५० उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसचे ८७ उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपचे २१ उमेदवार विजयी झाले असून ४२ उमेदवार आघाडीवर आहेत.

शरद पवार म्हणाले, “अलीकडच्या काळात भाजपकडून ज्या राज्यात त्यांचे राज्य नाही. त्या ठिकाणी तेथील आमदारांना फोडून त्या राज्यात सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न ते करत होते. यासाठी भाजपने सत्तेचा वापर करणे हे सूत्र त्यांनी ठिकठिकाणी वापरले. भाजपने कर्नाटकात देखील हीच अवस्था केली. भाजपने कर्नाटताली पहिले सरकार फोडून तिथे त्यांचे सरकार आणले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंनी केले, तेच कर्नाटकात देखील केले. तेच मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारसंदर्भात केले होते. मग, गोव्यात देखील भाजपला बहुमत नसतातना त्यांचे आमदार फोडून राज्य हातात घेतली. ही एक नवीन पद्धत साधन संपत्तीचा वापर करून राबवला जात आहे. पण, दुसरी बाजू म्हणजे फोडाफोडी आणि खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कर्नाटक दिसले आहे.”

फोडाफोडीचे राजकारण होणार नाही, याची खबरदारी जनतेने घेतली 

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आले तरी भाजप फोडाफोडीचे राजकारण करण्याची शक्यता आहे का?, पत्रकारांच्या प्रश्नाव शरद पवार म्हणाले, “फोडाफोडीचे राजकारणाची शक्याता नाकारता येत नाही. परंतु, कर्नाटकच्या जनतेनेच असा निकाल दिला की, फोडाफोडीला संधी मिळणार नाही, याची खबरदारी जनतेनेच घेतली आहे.”

हेही वाचा – “धर्म आणि जातीचे राजकारण जनतेला आवडत नाही”, शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

पंतप्रधानांनी बजरंग बली की जय घोषणा देणे योग्य नाही

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस स्थानिक मुद्दे मांडले तर, दुसरीकडे पंतप्रधानांनी बजरंग बली की जय, अशा घोषणा दिली होत्या, पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, “तुम्ही धर्म आणि जात वापरण्याचा प्रयत्न केला. यात एखाद्या वेळी सुरुवातीला यश येते. पण, लोकांना हे आवडत नाही. बजरंग बलीचा मुद्दा निवडणुकीत काढण्याचे काही कारण नव्हते. प्रधानमंत्री असो, आम्ही संसदेत धर्मनिरपेक्षतेवर आमची निष्ठा आहे, अशी शपथ घेतली असताना बजरंग बली की जय अशा घोषणा करणे माझ्या मते हे महत्त्वाच्या व्यक्तीला शोभत नाही. हे काम पंतप्रधानांनी केले आणि कर्नाटकाच्या जनतेने त्यांचे उत्तर दिले.”