घर देश-विदेश चंद्रानंतर आता सूर्यावर लक्ष... Aditya-L1 झेपवणार अंतराळात; ISROने जाहीर केली तारीख

चंद्रानंतर आता सूर्यावर लक्ष… Aditya-L1 झेपवणार अंतराळात; ISROने जाहीर केली तारीख

Subscribe

अंतराळात नवनवीन विक्रम करण्यास भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) पुढाकार घेत आहे. यातच आता चांद्रयान-3च्या यशानंतर इस्रो सौरमोहीम राबविणार आहे

बंगळुरू : चांद्रयान-3 या मोहिमेच्या यशस्वीतेनंतर आता भारतीय अंतरराळ संस्था सूर्याच्या दिशेने झेपण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आदित्य एल-1 नावाचे अंतरराळ यान लॉंच केले जाणार असून, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे यान प्रक्षेपित केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.(After the moon, now focus on the sun… Aditya-L1 will jump into space; Date announced by ISRO)

अंतराळात नवनवीन विक्रम करण्यास भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) पुढाकार घेत आहे. यातच आता चांद्रयान-3च्या यशानंतर इस्रो सौरमोहीम राबविणार आहे. एकुणच इस्रो अंतराळ यान इस्रोच्या दिशेने पाठविणार असून, या यानाच्या प्रक्षेपणाची तारीखही निश्चित करण्यात आली आहे.

आदित्य एल-1 करणार सूर्याचा अभ्यास

- Advertisement -

सध्या चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर विक्रम लॅंडर पोहचले असून,त्यामधून बाहेर निघालेले प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करत आहे. दरम्यान इकडे इस्रोने आता सौरमोहीम हाती घेतली असून, आदित्य एल-1 असे या सौर मोहिमेला नाव देण्यात आले आहे. हे अवकाशयान सूर्याचा अभ्यास करेल. सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर, अंतराळातील हवामान, सौरवादळं आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ही सौरमोहीम हाती घेतली आहे.

हेही वाचा : शिरीन पाठारे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, हा गौरव प्राप्त करणारे एकमेव मराठी अधिकारी

या दिवशी झेपावणार आदित्य एल-1

- Advertisement -

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने सौर मोहीम हाती घेतली असून, आदित्य एल-1 नावाचे अंतराळ यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठविले जाणार आहे. हे यान 2 सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी 11.50 वाजता श्रीहरीकोटातून प्रक्षेपित केले जाणार आहे.

हेही वाचा : लोकसभा निवडणुका डिसेंबरमध्ये! दावा करताना ममता बॅनर्जी यांनी दिले कारण…

15 लाख किलो मीटरपर्यंत जाणार आदित्य एल-1

इस्रोचे शास्त्रज्ज्ञ आणि मुख्य अन्वेषक प्रा. दुर्गेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रोची सूर्य मोहीम आदित्य एल-1 पृथ्वीपासून सूर्याच्या दिशेने 15 लाख किलोमीटर अंतरावर जाईल आणि सूर्याचा अभ्यास करेल. त्यांनी सांगितले की सूर्यापासून भरपूर अल्ट्राव्हायोलेट किरण बाहेर पडतात. आणि या दुर्बिणीच्या मदतीने तरंगलांबीच्या अतिनील किरणांचा अभ्यास केला जाणार आहे.

इथे पाहू शकता लाईव्ह प्रक्षेपण

राष्ट्रीय अंतराळ संस्थेने नागरिकांना आदित्य एल-1 चे प्रक्षेपण पाहण्यासाठी विशेष सोय केली आहे. देशवासीयांना आदित्य एल-1 चे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी https://lvg.shar.gov.in/VSCREGISTRATION/index.jsp या लिंकवर नोंदणी करावी लागणार तर SDSC-SHAR, श्रीहरिकोटा येथील लॉन्च व्ह्यू गॅलरीतून हे प्रक्षेपण लोकांना पाहता येणार आहे. ISRO ने द्वीट करत नागरिकांना प्रक्षेपण पाहण्यासाठी आमंत्रित केलं आहे.

- Advertisment -