घर क्रीडा चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅंडिंगनंतर भारतीय खेळाडूंचा आनंद गगनात; सचिननेही केले ट्वीट...

चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅंडिंगनंतर भारतीय खेळाडूंचा आनंद गगनात; सचिननेही केले ट्वीट…

Subscribe

23 ऑगस्टच्या संध्याकाळी भारताचे चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचल्यानंतर सर्वच स्तरातून इस्त्रोच्या शास्त्रज्ज्ञांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नवी दिल्ली : चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅंडिंगनंतर देशातील प्रत्येकाने आनंदोत्सव साजरा केला आहे आणि करतसुद्धा आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू मागे कसे राहतील. सध्या आयर्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने लॅंडिंगचा थरार लाईव्ह अनुभवला. त्यानंतर खेळांडूनी आप-आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून, क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरनेही ट्वीट करत इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतूक केले आहे. (After the successful landing of Chandrayaan-3, the joy of Indian athletes skyrocketed; Sachin also tweeted…)

23 ऑगस्टच्या संध्याकाळी भारताचे चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचल्यानंतर सर्वच स्तरातून इस्त्रोच्या शास्त्रज्ज्ञांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा ऐतिहासिक क्षण सर्वांनीच लाईव्ह अनुभवला. देशासह जगभरातील मान्यवरांकडून इस्रोचे कौतूक होत आहे. अशातच आता भारतीय क्रिकेट संघानेही चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. टाळ्यांच्या गजरात टीम इंडियाच्या खेळाडूंनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं. बीसीसीआयने खेळाडूंचा हा सुंदर व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

14 जुलै रोजी चंद्राच्या दिशेने यशस्वीरित्या झेपावलेल्या चांद्रयान-3 कडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण सत्यात उतरला. इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चांद्रयान-3 मधील विक्रम हा लँडर आज नियोजित वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरला आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला. आयर्लंड दौऱ्यावर गेलेला भारतीय क्रिकेट संघही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी टीव्हीसमोर उभा होता आणि विक्रम चंद्राच्या पृष्टभागावर उतरताच खेळाडूंनी जल्लोष केला.

सचिन म्हणाला विजयी ‘विश्व तिरंगा प्यारा’

भारताचा स्टार क्रिकेटर असलेल्या सचिन तेंडुलकरने देखील इस्रोच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा’ म्हणत सचिनने इस्रोच्या कामगिरीवर अभिमान व्यक्त केला. पुढे तो म्हणाला, इस्रो ही संघटना सर्वोत्तम भारताचं प्रतिनिधित्व करते. इस्रोतील विनम्र कष्टकरी महिला आणि पुरुषांनी एकत्र येत, प्रत्येक आव्हानांवर मात करत आपला तिरंगा उंच चंद्रावर फडकवला आहे.

- Advertisment -