घरराजकारणगुजरात निवडणूकपंजाबच्या विजयानंतर आपचे लक्ष्य कर्नाटककडे! आप नेत्यांनी मांडले विजयाचे गणित

पंजाबच्या विजयानंतर आपचे लक्ष्य कर्नाटककडे! आप नेत्यांनी मांडले विजयाचे गणित

Subscribe

राज्यात तीन मोठे पक्ष भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यास अपयशी ठरले आहेत, त्याचसोबत पक्ष जिंकण्यासाठी लढत आहे. आगामी निवडणुकीत आम आदमी पक्षाला चांगले यश मिळेल.

दिल्लीत सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांच्या आम आदमी (aap) पक्षाने दक्षिणेकडे मोर्चा वळवला आहे. दिल्ली सोबतच पंजां राज्यातही आम आदमी पार्टीचे सरकार आहे. अशातच कर्नाटक निवडणुकमध्येही निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. दरम्यान कर्नाटक (karnataka) राज्यातील 224 म्हणजेच सर्वच विधानसभा मतदार संघात आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा आम आदमी पक्षाने केली आहे. (karnataka assembly election)

दरम्यान आप हा पक्ष ‘जेसीबी’ला म्हणजेच (जेडीएस-काँग्रेस-बीजेपी) समर्थ पर्याय देईल, असे आपचे संयोजक पृथ्वी रेड्डी यांनी सांगितले. पक्षाचे प्रवक्ते आणि कर्नाटक आप पक्षाचे संयोजक पृथ्वी रेड्डी (pritwi reddy)  हे आहेत. त्यांनी सांगितल्या नुसार, कर्नाटक राज्यातील 224 मतदारसंघात आपचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय आम आदमी (aap) पक्षाने घेतला आहे. राज्यातील 170 मतदारसंघात बूथनिहाय कार्यकर्त्यांची निवड प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे. जानेवारीच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिली यादी जाहीर होण्याची शक्यताही आहे. कर्नाटक राज्यात सुमारे 58 हजार बूथ आहेत आणि पक्षाकडून प्रत्येक बुथवर किमान दहा कार्यकर्त्यांची नियुक्त केली जाणार आहे. असेही रेड्डी म्हणाले.

- Advertisement -

बुथ लेव्हलवर (booth level) कार्यकर्त्यांची नियुक्ती करून आम आदमी पक्ष कर्नाटक राज्यात अगदी तळागाळा पर्यंत पक्ष बांधणी करत आहे. भ्रष्टाचार, पैसा याविरुद्ध आप पक्ष लढा डेटग आहे. स्थानिक पातळीवरचे प्रश्‍न, समस्या जनतेसमोर मांडण्याची जबाबदारी बूथवर नियुक्त करण्यात येणाऱ्या कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली आहे. आप पक्षाला कर्नाटकात लोकप्रियता मिळत आहे असेही रेड्डी म्हणाले. राज्यात तीन मोठे पक्ष भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यास अपयशी ठरले आहेत, त्याचसोबत पक्ष जिंकण्यासाठी लढत आहे. आगामी निवडणुकीत आम (aap) आदमी पक्षाला चांगले यश मिळेल. असा विश्वास सुद्धा रेड्डी यांनी व्यक्त केला. दरम्यान निवडणुकांच्या तोंडावर सगळेच पक्ष जोमाने निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे.

मतदारांसमोर चौथा पक्ष म्हणून जात नसून ‘जेसीबी’ ला पर्याय म्हणून आम्ही जात आहोत. जे म्हणजे जेडीएस- सी म्हणजे काँग्रेस आणि बी म्हणजे भाजप. या तिन्ही पक्षांनी राज्यातील जनतेच्या आशा धुळीस मिळविल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra mod) यांच्या गुजरात राज्यात आप पक्ष विजयी झाला तर कर्नाटकातील (karanataka) विजयाचा मार्ग आम आदमी पक्षासाठी सुकर होऊही असंही पृथ्वी रेड्डी म्हणाले.

- Advertisement -

हे ही वाचा – मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात बदनामीकारक पोस्ट करणे पडले महागात; विद्यार्थी अटकेत

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -