घरदेश-विदेश5000 किलोमीटर प्रवास करत रशियातील पक्षी पोहोचले नागपूरात

5000 किलोमीटर प्रवास करत रशियातील पक्षी पोहोचले नागपूरात

Subscribe

मागील अनेक महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धामुळे तेथील मानवी जनजीवन विस्कळीत होऊ लागलं आहे. या युद्धाचा फटका फक्त माणसांनाच नाहीतर तेथील पशु-पक्षांना देखील भोगावा लागत आहे. युद्धात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक हत्यारांमुळे आणि बाँबमुळे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदुषण देखील वाढू लागले आहे. अनेक निष्पाप पशु-पक्षांची या युद्धांत हानी होऊ लागली आहे. त्यामुळे तेथील पक्षी दुसऱ्या देशांमध्ये स्थलांतर करु लागले आहेत.

भारतातही राशियातील अनेक पक्षांनी आत्तापर्यंत स्थलांतर केलं आहे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, राशियातील काही पक्षी 5000 किलोमीटर प्रवास करत नागपूरमध्ये पोहोचले आहेत. ‘पाईड हॅरिअर’ आणि ‘हॅरिअर’ प्रजातीतील पक्षी सध्या वर्धा रोडवर मुक्कामी आहेत.

- Advertisement -

The Pied Harrier (Circus melanoleucos) is an Asian species of bird of prey in the family Accipitridae. It is migratory, breeding from Amur vall… | 애완용 새, 맹금류, 화려한 새

या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या यंदा कमी झाली असली तरीही ‘पाईड हॅरिअर’ आणि ‘हॅरिअर’प्रजातीतील पक्ष्यांनी नागपूरातील पक्षीतज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. येथील पाणथळ जागांवर दरवर्षी हिवाळ्यात हजारो पक्षी स्थलांतरित होतात. परंतु यावर्षी जास्त पाऊस पडल्यामुळे पाणथळ जागांवर स्थलांतरित पक्ष्यांसाठी फार अनुकूल परिस्थीती नाही.

- Advertisement -

Pied Harrier - eBird

सध्या नागपूर लगतच्या परिसरात या पक्ष्यांनी मुक्काम केला असून पक्षीतज्ञांसाठी ते आकर्षण ठरत आहेत. याआधी देखील जानेवारी 2021 मध्ये ‘पाईड हॅरिअर’ची नोंद झाली होती.

 


हेही वाचा :

एअर इंडिया पुन्हा वादात! ‘त्या’ घटनेनंतर आता प्रवाशाच्या जेवणात आढळला दगड

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -