Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी ट्विटर, मेटा, अॅमेझॉननंतर सिस्को आणि झोमॅटोमध्येही होणार कर्मचारी कपात

ट्विटर, मेटा, अॅमेझॉननंतर सिस्को आणि झोमॅटोमध्येही होणार कर्मचारी कपात

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून आयटी क्षेत्राशीतील कंपन्यांवर मंदीचे सावट आल्याचे पाहायला मिळत आहे. या आर्थिक मंदीमळे ट्विटर, मेटा, अॅमेझॉन यांसारख्या दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. अशातच आता सिस्को आणि झोमॅटो या कंपन्यांनीही कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आयटी क्षेत्राशीतील कंपन्यांवर मंदीचे सावट आल्याचे पाहायला मिळत आहे. या आर्थिक मंदीमळे ट्विटर, मेटा, अॅमेझॉन यांसारख्या दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. अशातच आता सिस्को आणि झोमॅटो या कंपन्यांनीही कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. सिस्कोमधून पाच टक्के कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावण्यात येणार आहे. तर भारतीय फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटो कंपनीने या आठवड्यापासूनच कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळते. (After Twitter Meta Amazon Cisco and Zomato will also cut staff)

सिलिकॉन व्हॅली बिझनेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, सिस्कोमध्ये जवळपास 4100 कर्मचारी कपात होणार आहे. जगभरात सिस्कोचे 83,000 हजार कर्मचारी आहेत. व्यवसायात ‘पुनर्संतुलन’ करण्यासाठी कर्मचारी कपात करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप सिस्कोचे अध्यक्ष आणि सीईओ चक रॉबिन्स यांनी कंपनीतील नोकरकपातीबाबत कोणतेही भाष्य केले नाही.

- Advertisement -

सिस्कोचे मुख्य आर्थिक अधिकारी स्कॉट हेरेन यांनी म्हटले की, “आम्ही काही प्राधान्यक्रम निश्चित करत आहोत. काही क्षेत्रांमध्ये आम्हाला अधिक गुंतवणूक करायची आहे. सिक्युरिटी, क्लाउड डिलिव्हरर्ड प्रोडक्ट अशा उत्पादनांकडे लक्ष देत आहोत. आम्ही ज्या नवीन क्षेत्रात गुंतवणूक करत आहोत, त्या क्षेत्रात निर्माण झालेल्या रोजगाराची संख्या पाहिल्यास या नोकरकपातीचा परिणाम फार कमी लोकांवर झालेला असू शकतो. आम्ही आमच्या कर्मचार्‍यांना त्या भूमिकांशी जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहोत. तिथे कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचा कस लागणार आहे”

भारतीय फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटो कंपनीने या आठवड्यापासूनच कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. उत्पादन, तंत्रज्ञान, कॅटलॉग आणि मार्केटींग यासारख्या क्षेत्रांमध्ये कमीतकमी 100 कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्याचे समजते. झोमॅटो कंपनी आपल्या एकूण कर्मचार्‍यांपैकी किमान 4 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा विचार करत आहे. झोमॅटोमध्ये सध्या सुमारे 3,800 कर्मचारी काम करत आहेत.

- Advertisement -

मे 2020 मध्ये, फूड डिलिव्हरी अॅपने कोरोनामधील व्यवसायातील मंदीमुळे 13 टक्के कर्मचारी काढून टाकले. यासोबतच वरिष्ठ अधिकारीही झोमॅटोसोबतचे संबंध तोडत आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला झोमॅटोने जाहीर केले की राहुल गंजू देखील कंपनी सोडत आहे. यासोबतच कंपनीचे उपमुख्य वित्तीय अधिकारी नितीन सावरा आणि ग्लोबल ग्रोथचे उपाध्यक्ष सिद्धार्थ झंवर यांनीही अलीकडेच कंपनी सोडली आहेत.


हेही वाचा – NDA प्रवेश परीक्षेत औरंगाबादची अनुष्का अनिल बोर्डे द्वितीय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -