घरताज्या घडामोडीनोकरीचा पहिला दिवस आनंदाचा अन् दुसरा दिवस अखेरचा; METAच्या कर्मचाऱ्याची भावनिक पोस्ट

नोकरीचा पहिला दिवस आनंदाचा अन् दुसरा दिवस अखेरचा; METAच्या कर्मचाऱ्याची भावनिक पोस्ट

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून ट्विटरमधील नोकरकपातीमुळे अनेकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले. ट्विटरनंतर आता फेसबुकची मूळ कंपनी असेलेल्या 'META'नेही मोठ्या प्रमाणात नोकरकपातीला सुरूवात केली आहे. दोन्ही कंपन्यांमधील नोकरकपातीमुळे अनेक भारतीयांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ट्विटरमधील नोकरकपातीमुळे अनेकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले. ट्विटरनंतर आता फेसबुकची मूळ कंपनी असेलेल्या ‘META’नेही मोठ्या प्रमाणात नोकरकपातीला सुरूवात केली आहे. दोन्ही कंपन्यांमधील नोकरकपातीमुळे अनेक भारतीयांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांमध्ये एक कर्मचारी असा होता, ज्याचा ‘META’ कंपनीत नोकरी लागल्याने आनंद गगनाव मावत नव्हता. पण दुसऱ्याच दिवशी त्याच्या आनंदावर विरजण पडले. याबाबत त्या कर्मचाऱ्याने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (after two days of joining meta fired the Indian man from his job relocated to Canada to work with Facebook)

हिमांशू व्ही असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. हिमांशू व्ही हा भारतीय नागरिक आहे. कामावर रुजू झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. कामावरून काढल्यानंतर हिमांशूने लिंक्डइनवर पोस्टद्वारे आपले दु:ख शेअर केले आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्यासोबत घडलेल्या प्रकारामुळे तो हैराण आणि अस्वस्थ का आहे, हे सांगितले आहे.

- Advertisement -

हिमांशूने पोस्टमध्ये लिहिल्यानुसार, “‘मी त्या सर्वांसोबत आहे जे सध्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. आता माझे काय? खरे सांगायचे तर, माझ्याकडे कोणतीही कल्पना नाही. आता पुढे काय होते याची मी वाट पाहतोय. जर तुम्हाला कॅनडा किंवा भारतातील सॉफ्टवेअर इंजिनीअर्ससाठी नोकरी किंवा पोस्ट मिळाल्यास, कृपया मला कळवा”, असे त्याने लिहिले आहे.

हिमांशूची ही भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मेटा आणि ट्विटरच्या नोकरकपातीला केवळ हिमांशूच नाही तर हजारो तरुण बळी पडले आहेत. दरम्यान, फेसबुकची मूळ कंपनी मेटाने 13 टक्के म्हणजे जवळपास 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी बुधवारी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, उत्पन्नात झालेली घसरण आणि तंत्रज्ञान उद्योगात सुरू असलेल्या संकटामुळे हा निर्णय घ्यावा लागला.

- Advertisement -

हेही वाचा – कर्नाक पुलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेवर 27 तासांचा ब्लॉक; अनेक गाड्या होणार रद्द

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -