घरताज्या घडामोडीBoeing 737 Max: दोन जीवघेण्या अपघातांनंतर DGCI ने बोईंग 737 जेटवरील बंदी...

Boeing 737 Max: दोन जीवघेण्या अपघातांनंतर DGCI ने बोईंग 737 जेटवरील बंदी उठवली

Subscribe

नागरी उड्डयन महासंचालनालयाने म्हणजेच DGCA ने गुरुवारी बोईंग 737 मॅक्स जेट विमानांवरील बंदी उठवण्याची घोषणा केली. २०१९ मध्ये भारताने दोन मोठ्या अपघातांनंतर या विमानावर बंदी घातली होती. मिळालेल्या माहितीनुसार, डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही या महत्त्वपूर्ण निर्णयाला दुजोरा देत आता या विमानाचा वापर केला जाऊ शकतो. इथिओपियन एअरलाइन्सच्या विमानाला अपघात झाल्यानंतर भारताने मार्च २०१९ मध्ये हा निर्णय घेतला होता. या विमान अपघातात १५७ लोकांचा मृत्यू झाला होता. दुर्घटनाग्रस्त विमान बोईंग 737 मॅक्स मॉडेल होते.

- Advertisement -

यापूर्वी ऑक्टोबर २०१८ मध्ये देखील इंडोनेशियात लॉयल एअर 737 मॅक्स विमान कोसळले होते. त्यावेळी अपघातात १८० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर मार्च २०१९ मध्ये भारतासह अनेक देशांच्या हवाई वाहतूक नियामकांनी बोईंग 737 मॅक्स विमानांच्या ऑपरेशनवर बंदी घातली होती. दरम्यान, विमान निर्माता कंपनी बोईंगने मार्च २०१९ पासून आपल्या विमानात अनेक बदल केले आहेत, जेणेकरून विविध देशांमधील हवाई वाहतूक नियामक पुन्हा प्रवासी उड्डाण संचालनासाठी परवानगी देतील. सध्या फक्त स्पाइसजेट एअरलाइन्सकडे भारतात बोइंग 737 मॅक्स जेट विमान आहे.

स्पाईस जेटकडे अशी साधारण १२ विमाने आहेत, तर जेट एअरवेजकडे ५ विमाने आहेत. नागरी उड्डयन मंत्रालयाने एका ट्विटमध्ये म्हटले होते की, डीजीसीएने बोईंग 737 मॅक्स विमानांच्या उड्डाणावर तात्काळ बंदी घातली आहे. सुरक्षित ऑपरेशनसाठी योग्य सुधारणा आणि सुरक्षा उपाय केल्याशिवाय ही विमाने उड्डाण करणार नाहीत. मात्र त्यानंतर आता त्यात ऑपरेशनसाठी योग्य सुधारणा करण्यात आल्या आहेत.


भारतात Yahoo ची न्यूज वेबसाईट झाली बंद; जाणून घ्या कारण

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -