Udayanidhi Stalin : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (Tamil Nadu Chief Minister MK Stalin) यांचे पुत्र आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी शनिवारी (2 सप्टेंबर) सनातन धर्मावर (Sanatan Dharma) वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. उदयनिधी यांच्या वक्तव्यानंतर भाजपसह (BJP) देशातील सर्व प्रमुख पक्षांनी तामिळनाडू सरकारला घेरले असून उदयनिधी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी होताना दिसत आहे. अशातच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परंतु त्यांच्या वक्तव्याने आणखी वाद चिघळण्याची शक्यता आहे. (After Udayanidhi Stalins statement about Sanatan Dharma will Khargens statement inflame the controversy)
हेही वाचा – Udayanidhi Stalin यांच्या सनातन धर्माच्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
प्रियांक खर्गे म्हणाले की, जो धर्म समानतेचा पुरस्कार करत नाही. तुम्हाला माणूस म्हणून सन्मानाची हमी देत नाही, तो धर्म नाही. माझ्या मते जो धर्म तुम्हाला समान अधिकार देत नाही किंवा तुम्हाला माणसासारखी वागणूक देत नाही, तो एक रोग आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रियांक खर्गे यांनीही सनातन धर्माला रोग म्हटल्याने वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
#WATCH | Bengaluru, Karnataka: On One Nation, One Election, Karnataka Minister Priyank Kharge says, “One Nation, One Election is a diversion from INDIA alliance…They (BJP) are scared… They did not call the special session of Parliament for a pandemic, Manipur, or Chinese… pic.twitter.com/3Rm02QJgXe
— ANI (@ANI) September 4, 2023
उदयनिधी स्टॅलिन काय म्हणाले?
चेन्नईतील एका लेखक संमेलनादरम्यान उदयनिधी स्टॅलिन यांनी वक्तव्य केले की, सनातन धर्म हा सामाजिक न्यायाच्या कल्पनेच्या विरोधात असून तो रद्द केला पाहिजे. सनातन धर्म हा मलेरिया आणि डेंग्यूसारखाच आहे, त्यामुळे त्याला विरोध नाही, तर त्याचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे. यावेळी त्यांनी असा युक्तिवाद केला की, सनातन ही कल्पना मूळतः प्रतिगामी आहे. जात आणि लिंगाच्या आधारावर लोकांना विभाजित करते आणि मूलभूतपणे समानता आणि सामाजिक न्यायाला विरोध करते.
हेही वाचा – चांद्रयान – 3 मोहीम प्रक्षेपणाच्या काऊंटडाऊनची घोषणा करणाऱ्या एन. वलरमथींचे निधन
कोण आहेत उदयनिधी स्टॅलिन?
तामिळनाडू राज्याचे माजी मुख्यमंत्री व लोकप्रिय नेते कलैग्नार उर्फ एम. करुणानिधी यांचे नातू व द्रमुकचे सर्वेसर्वा असेलेले एम. के. स्टॅलीन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन आहेत. 43 वर्षीय उदयनिधी स्टॅलिन यांनी अनेक चित्रपटांत अभिनेत्याची भूमिका केली असून काही चित्रपटांची निर्मितीही केली आहे. 2013 मध्ये त्यांना फिल्मफेअरचा पदार्पणातील सर्वोत्तम युवा अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी ते द्रमुकचे स्टार प्रचारक होते. मात्र त्यांनी वेळोवेळी राजकारणातील प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली. 2019 च्या निवडणुकीत द्रमुकला घवघवीत यश मिळाल्यानंतर त्यांची युवा शाखेच्या चिटणीसपदी निवड झाली. राज्यातील पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी अखेरच्या टप्प्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्यावर तोफ डागली. मोदी यांनी छळ केल्यामुळे भाजपाचे ज्येष्ठ नेते सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा बळी गेला, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले होते. सध्या ते तामिळनाडू सरकारमधील क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री म्हणून काम करत आहेत.