नवी दिल्ली : भारतीय रेल्वे विभागाने सुरू केलेली वंदे भारत एक्सप्रेस जवळजवळ सर्व प्रमुख शहरांशी जोडलेली आहे. वंदे भारतमध्ये देण्यात आलेल्या सुविधांमुळे लोकांना रेल्वेने प्रवास करणे खूप सोपे झाले आहे. परंतु, जास्त भाडे असल्याने अजूनही अनेकजण या रेल्वेने प्रवास करू शकत नाही. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने बजेट फ्रेंडली ‘वंदे साधरण’ रेल्वे आणण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य प्रवाशांचा माफक तिकिटात आणि आरामदायी व्हावा हा यामागील उद्देश आहे.(After Vande Bharat Vande Abhand will now run for common people Travel fares are within reach)
केंद्र सरकारकडून सुरू होणाऱ्या वंदे सर्वसाधारण ही रेल्वे अशा मार्गांवर चालवण्याची तयारी सुरू आहे की, ज्यावर स्थलांतरित मजुरांची जास्त वर्दळ असते आणि गाड्यांमध्ये मोठी गर्दी असते. त्यासाठी रेल्वेने सर्वेक्षणही केले आहे.
रेल्वेला 24 डबे बसवण्यात येणार
ट्रेन बनवण्याची प्रक्रिया इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF), चेन्नई येथे सुरू झाली आहे. येत्या काही महिन्यांत ती तयार होईल. यात सर्व द्वितीय श्रेणीचे डबे असणार आहेत. त्यामुळे त्याचे भाडेही कमी असणे अपेक्षित आहे. या गाड्यांमध्ये एकूण 24 एलएचबी कोच असतील आणि दोन इंजिन बसवण्यात येणार आहेत.
हेही वाचा : गोकुळ दूध महासंघाची सर्वसाधारण सभा ठरतेय वादळी; आरोप-प्रत्यारोपांच्या नुसत्या फैरी
वंदे भारत सारख्याच सर्व सुविधा
सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या या वंदे सर्वधारण रेल्वेमध्ये 24 कोच असतील ज्यात बायोव्हॅक्यूम टॉयलेट्स, पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि चार्जिंग पॉइंट्स यांसारख्या वैशिष्ट्यांसह ही रेल्वे डिझाइन केली जाणार आहे. याशिवाय सुरक्षेसाठी त्यात सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार आहेत. याशिवाय स्वयंचलित दरवाजाची व्यवस्थाही असणार आहे. या गाड्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या गाड्यांचा वेग मेल आणि एक्स्प्रेसपेक्षा जास्त असेल आणि थांबेही कमी असणार आहेत.
सर्वसामान्यांचा विचार करूनच रेल्वेची बांधणी
या रेल्वे गाड्या सर्वसामान्य वर्गाला लक्षात घेऊन तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे ही ट्रेन भाड्याच्या बाबतीत खूपच स्वस्त असेल. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पुढे आले नाही. रेल्वेने स्वस्त भाड्यांसह सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन वंदे भारत ट्रेनची रचना केली आहे.