घरताज्या घडामोडीKabul Airport Attack: काबूल विमानतळाजवळ पुन्हा हल्ला; एकाचा मृत्यू तर दोन जण...

Kabul Airport Attack: काबूल विमानतळाजवळ पुन्हा हल्ला; एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी

Subscribe

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूल विमानतळाजवळ (kabul Airport) आज, रविवार पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. तीन सीरियल बॉम्बस्फोटानंतर पुन्हा एकदा काबूल विमानतळाजवळ हल्ला करण्यात आला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार काबूल विमानतळाजवळील खाजा बघरा भागातील एका रहिवाशांच्या घरावर रॉकेट जाऊन पडले आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरलेले दिसले. या रॉकेट हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

यापूर्वी तीन सीरियर बॉम्बस्फोटामुळे राजधानी काबूल हादरली होती. गुरुवारी तीन बॉम्बस्फोट झाले होते, ज्यामध्ये १६९ अफगाणी नागरिक आणि १३ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान आज झालेल्या रॉकेट हल्ल्यात अमेरिकन सैन्य निशान्यावर असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

 

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुन्हा एकदा काबूल विमानतळाजवळ हल्ला होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. जो बायडेन म्हणाले होते की, गुरुवारी झालेला हल्ला हा शेवटचा नाही आहे. याशिवाय बरेच हल्ले होऊ शकतात. पुढील २४ ते ३६ तासांमध्ये पुन्हा हल्ला होऊ शकतो. या अंदाजानुसार पुन्हा एकदा आज काबुल विमानतळाजवळ हल्ला करण्यात आला आहे. या झालेल्या रॉकेट हल्ल्यात मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी आयएसआयएस-केने स्वीकारली होती. त्यानंतर अमेरिकेने हल्ला केलेल्यांना लवकरच बदल घेणार असल्याचे सांगितले होते. बॉम्बस्फोटाच्या ४८ तासांनंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये एअरस्ट्राईक करून बदला घेतला.


हेही वाचा – Afghanistan Crisis: तालिबानने गाण्यांसह महिलांच्या आवाजावरही घातली बंदी!


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -