घरदेश-विदेशसनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरियाशी करणाऱ्या उदयनिधींचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; काय म्हणाले?

सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरियाशी करणाऱ्या उदयनिधींचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; काय म्हणाले?

Subscribe

चेन्नई : तामिळनाडूचे मंत्री आणि द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी यापूर्वी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली होती. त्यानंतर मोठा वाद झाला आणि इंडियाच्या नेत्यांमध्येही अस्वस्थता होती. मात्र त्यानंतरही उदयनिधी स्टॅलिन यांनी सोमवारी (6 नोव्हेंबर) पुन्हा एकदा सनातन धर्माला विरोध केला पाहिजे. त्यांच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उदयनिधी स्टॅलिन पुन्हा एकदा केलेले नवे विधान विरोधी पक्षांसाठी अडचणीचे ठरू शकते. (Again Udayanidhis controversial statement comparing Sanatan Dharma to dengue malaria what did you say)

हेही वाचा – कुपवाडा : भारत-पाक सीमेवरील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

- Advertisement -

उदयनिधी स्टॅलिन यांनी यापूर्वी सनातन धर्माविरोधात केलेल्या वक्तव्याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू पोलिसांना कठोर फटकारले होते. तमिळनाडू पोलिसांना फटकारताना मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले होते की, कोणत्याही व्यक्तीला फुटीर विचारांना चालना देण्याचा किंवा कोणत्याही विचारधारेला संपविण्याचा अधिकार नाही. यानंतर जारी केलेल्या आपल्या ताज्या वक्तव्यात उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा सनातन धर्माला विरोध केल्याची चर्चा आहे.

उदयनिधी म्हणाले की, आम्ही अनेक वर्षांपासून सनातन धर्माबद्दल बोलत आहोत. नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) ही अलीकडील समस्या आहे. सनातन धर्माचा मुद्दा शेकडो वर्षांचा आहे. याला आमचा सदैव विरोध राहील. कारण मी काहीही चुकीचे बोलत नाही आहे. मी जे बोललो ते बरोबर आहे आणि मी कायदेशीर परिणामांना सामोरे जाण्यास तयार आहे. मी माझे विधान बदलणार नाही. सनातन धर्माला विरोध करण्याऐवजी ते रद्द केले पाहिजे, असे परखड मत उदयनिधी स्टॅलिन यांनी मांडले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘मला अंधारात ठेवण्यात आलं’, अधीर रंजन चौधरींची राष्ट्रपतींना पत्र लिहून CIC नियुक्तीबद्दल नाराजी

यापूर्वी उदयनिधी स्टॅलिन काय म्हणाले?  

उदयनिधी स्टॅलिन यांनी यापूर्वी म्हटले होते की, सनातन हे नाव संस्कृतमधून आले आहे. जे सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे. आम्ही कोरोना, डेंग्यू आणि डासांना विरोध करू शकत नाही. त्यांना संपवावे लागते, त्याचप्रमाणे सनातन धर्मालाही संपवावे लागेल, असे म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -