घरदेश-विदेशबरबादीची दुवा : पाकिस्तान, तालिबान मुर्दाबादच्या घोषणा, तालिबान्यांकडून बेछूट गोळीबार

बरबादीची दुवा : पाकिस्तान, तालिबान मुर्दाबादच्या घोषणा, तालिबान्यांकडून बेछूट गोळीबार

Subscribe

तालिबान सरकार उदयास येण्यापूर्वीच अफगाण नागरिकांनी सुरू केला विरोध

अफगाणिस्तानावर ताबा मिळवत क्रूरपणे अत्याचार करणाऱ्या तालिबान्यांना स्थानिकांचा प्रचंड विरोध होतो आहे. मंगळवारी अफगाण महिलांनी रस्त्यावर उतरून तालिबान्यांना विरोध केला. तालिबान्यांनी बेछूट गोळीबार करत हा विरोध दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. काबूलमध्ये निघालेल्या या मोर्चातील जनतेने तालिबान मुर्दाबादचे नारे देतानाच, पाकिस्तानच्या बरबादीसाठी दुवा मागितली. विशेष म्हणजे या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग होता.

तालिबाननं पंजशीर ताब्यात घेतल्याची घोषणा केलीय. मात्र, अद्याप अहमद मसूद, अमरुल्ला सालेह यांनी दुजोरा दिलेला नाही. उलट नॉर्दन अलायन्स तालिबान्यांच्याविरोधात लढत असल्याचं जाहीर केलंय. दरम्यान, काबूलमध्ये निघालेल्या मोर्चात शंभरावर नागरिक सहभागी झाले होते. त्यात महिलांचं प्रमाण मोठं होतं. या मोर्चेकऱ्यांनी पाकिस्तानी राजदुताबाहेर तीव्र प्रदर्शन केलं. यावेळी पाकिस्तान अफगाणिस्तानात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. याचवेळी मोर्चेकऱ्यांनी पाकिस्तानविरोधात घोषणा दिल्या. पाकिस्तान मुर्दाबाद, पंजशीर जिंदा रहे… अशाही घोषणा त्यांनी दिल्या. पंजशीरमध्ये तालिबान किंवा पाकिस्तानला घुसखोरी करू दिली जाणार नसल्याची प्रतिज्ञा महिलांनी केली.

- Advertisement -

पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले

आयएसआय प्रमुख आपल्या खास कमांडोंसह काबूलमध्ये तळ ठोकून आहे. त्याच्याच पाठबळावर तालिबानने पंजशीरमध्ये अहमद मसूद आणि अमरुल्ला सालेहविरोधात मोर्चा उघडलाय. अफगाणिस्तानचा भाग असलेल्या पंजशीर व्हॅलीमध्ये पाकिस्तानी लष्कराने ड्रोन हल्ले केल्याचं उघडकीस आलंय. अर्थात, तालिबानने स्वतःच्याच प्रदेशावर व जनतेवर हल्ले करण्यासाठी पाकिस्तानचा आधार घेतल्याचे स्पष्ट झालंय. त्याचाच रोष जनतेतून दिसून आलाय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -