घरदेश-विदेशअग्निपथ योजनेवरून उत्तर प्रदेशात हिंसाचार; 500 अज्ञातांविरोधात FIR दाखल; मालमत्ता होणार जप्त

अग्निपथ योजनेवरून उत्तर प्रदेशात हिंसाचार; 500 अज्ञातांविरोधात FIR दाखल; मालमत्ता होणार जप्त

Subscribe

याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात 31 नावसहित व 150 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर सिक्रारा पोलीस ठाण्यात एकूण 78 नावासहित 250 अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात भीषण हिंसाचार उफाळून आला होता. या हिंसाचाराप्रकरणी 125 नावं समोर आली असून 500 अज्ञात लोकांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. बदलापूर आणि सिक्रारा पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्या 41 हल्लेखोरांना अटक करत ताब्यात घेतले आहे. बदलापूर पोलिसांच्या ताब्यात 12 आणि सिक्रारा पोलिसांच्या ताब्यात 29 हल्लेखोर आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, हिंसाचार करणाऱ्यांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात 31 नावसहित व 150 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर सिक्रारा पोलीस ठाण्यात एकूण 78 नावासहित 250 अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी 17 जून रोजी जौनपूर शहरातील वाजिदपूर तिराहे येथे रास्ता रोको करून हिंसाचार निर्माण केल्याप्रकरणी लाईन बाजार पोलिस ठाण्यात 16 नावासहित व्यक्तींसह 100 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जौनपूरमध्ये शनिवारी अग्निपथ योजनेच्या सैन्यात भरतीच्या नवीन धोरणाच्या निषेधार्थ रेल्वे स्टेशनवर गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी बदलापूर पोलिस ठाण्यात 31 नावासहित व्यक्तींविरोधात आणि 150 अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर सिक्रारा पोलीस ठाण्यात 78 नावासहित आणि 250 अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही सुरू आहे. (Agneepath Row)

आतापर्यंत 41 जणांना अटक

जौनपूर पोलिसांना माहिती देण्यात आली की, आतापर्यंत ओळखल्या गेलेल्या 41 हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. त्यांची मालमत्ताही जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. यासोबतच त्यांच्यासोबत भेटलेल्यांचीही नावे एफआयआरमध्ये आणली जात आहेत. सीसीटीव्ही फुटेज, उपलब्ध व्हिडिओ आणि पाळत ठेवणाऱ्या टीमच्या मदतीने इतर हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर आगाऊ तपास कारवाई केली जात आहे. (Opposition to Agneepath scheme)

- Advertisement -

अग्निपथ योजनेविरोधात शनिवारी सलग चौथ्या दिवशी निदर्शने करण्यात आली. उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणासह पंजाबमध्येही तरुणांनी रस्त्यावर उतरत या योजनेला अद्यापही विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले. बिहारमध्ये आतापर्यंत २२ जिल्ह्यांमध्ये अग्निपथ योजनेविरोधात हिंसक घटना घडल्या आहेत, तर शनिवारी पुकारण्यात आलेल्या बिहार बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बिहारमधील बहुतांश जिल्ह्यांत मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. देशभरातून अग्निपथ योजनेला विरोध होत असून याचा सर्वाधिक फटका भारतीय रेल्वेला बसला आहे. आतापर्यंत ३४० गाड्यांवर परिणाम झाल्याने रेल्वेचे ४० कोटींहून अधिक नुकसान झाले आहे.


राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधकांचे टेन्शन वाढले

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -