घरताज्या घडामोडीAgni-5 Missile : वाऱ्याच्या २४ पट वेगवान अग्नि ५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Agni-5 Missile : वाऱ्याच्या २४ पट वेगवान अग्नि ५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Subscribe

भारताने आज ओरिसा येथील एपीजे अब्दुल कलाम द्वीप येथून ५ हजार किलोमीटर पर्यंत मारा करणाऱ्या अग्नि – ५ क्षेपणास्त्राची चाचणी केली. जमीनीवरून मारा करणारे हे अतिशय ताकदवाद असे क्षेपणास्त्र आहे. अग्नि ५ मिसाइलच्या यशामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढली आहे. चीनविरोधात अणुऊर्जेच्या वापराला विरोध करण्याच्या दृष्टीने हे एक महत्वपूर्ण असे पाऊल मानले जात आहे. ओरिसाच्या एपीजे अब्दुल कलाम द्वीप येथे बुधवारी सायंकाळी ७.५० वाजता या क्षेपणास्त्राचे परीक्षण करण्यात आले. सर्वसामान्य माणसाची पापणी लवण्यासाठी सरासरी ६ सेकंद इतका कालावधी असतो, इतक्या कालावधीत हे क्षेपणास्त्र ५० किलोमीटर पुढे वेदगाने सरकते. भारत सरकारच्या सध्याच्या रणनितीनुसार भारत याचा वापर हत्यार स्वरूपात करणार नाही. पण सैन्याची क्षमता वाढवण्याचा क्षेपणास्त्राचा उद्देश आहे.

काय आहे अग्नि ५ चे वैशिष्ट्य ?

अग्नि ५ हे जमीनीच्या पृष्ठभागावर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मारा करणारे असे प्रभावशाली असे क्षेपणास्त्र आहे. तब्बल ५ हजार किलोमीटरच्या लक्ष्य गाठण्यास हे क्षेपणास्त्र समर्थ आहे. या क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे भारताने आपल्या सैन्याच्या शत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात बळकटी मिळवली आहे. महत्वाचे म्हणजे अग्नि ५ क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे शेजारील राष्ट्रांचे धाबे दणाणले आहे. त्यांच्याच चिंतेत आणखी भर पडली आहे. या क्षेपणास्त्रामध्ये तीन टप्प्यात अशा इंधनावर आधारीत इंजिनचा वापर करण्यात आला आहे. चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अग्नि ५ च्या लक्ष्य गाठण्याच्या क्षमतेमुळे चिंतेत आहेत. प्रत्यक्षात अग्नि ५ कितपत अंतर पार करत लक्ष्य गाठू शकते अशी चिंता दोन्ही देशांना लागलेली आहे. या क्षेपणास्त्राचे परीक्षण अशा स्थितीत करण्यात आले आहे, जेव्हा भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमध्ये सीमेवर तणावाचे वातावरण आहे. या मिसाइलचे वैशिष्ट म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा २४ पट वेगवान असे हे क्षेपणास्त्र आहे. क्षेपणास्त्राची ट्रॅजेक्टरी आणि फ्लाईट पॅरामीटर हे रडारच्या माध्यमातून केंद्रित करण्यात येणार आहेत. तसेच इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टिम, टेलिमेटरी स्टेशनच्या माध्यमातून हे क्षेपणास्त्र चाचणी दरम्यान ट्रॅक करण्यात आले. त्यानंतर बंगालच्या खाडीत हे क्षेपणास्त्र अलगद उतरले.

- Advertisement -

क्षमता काय ?

अग्नि ५ अंतरमहाद्वीपीय बैलिस्टिक क्षेपणास्त्राचे वजन ५० हजार किलोग्रॅम आहे. तर याची लांबी १७.५ मीटर असून व्यास २ मीटर आहे. या क्षेपणास्त्रावर १५०० किलोग्रॅम वजनाचे अणुक्षेपणास्त्र वापरता येते. एका सेकंदामध्ये ८.१६ मीटरचे अंतर पार करण्याची याची क्षमता आहे. ताशी २९ हजार ४०१ किमी वेगाने हे क्षेपणास्त्र शत्रूवर हल्ला करते. भारत सरकार जर हे क्षेपणास्त्र वापरते तर संपुर्ण आशिया, यूरोप आणि आफ्रिकेच्या काही हिश्शात हल्ला करण्याची क्षमता आहे. या क्षेपणास्त्राचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे MIRV तंत्रज्ञानामुळे मल्टीपल इंडिपेडेंटली टार्गेटेबल री एंट्री व्हीकल्सच्या माध्यमातून वॉरहेडमध्ये अनेक हत्याचारांचा वापर करणे शक्य आहे. त्यामुळेच एकच क्षेपणास्त्र एकाचवेळी अनेक टार्गेटवर निशाणा साधू शकते.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -