युद्धनौका, पाणबुड्यांपासून इतर विभागांमध्येही महिला अग्निवीरांची होणार भरती

अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर म्हणून भारताच्या तीन सुरक्षा दलात सैनिक स्तरावर चार वर्षांसाठी सेवा बजावण्याची संधी मिळेल.

Agnipath recruitment scheme Indian Navy to recruit 20 percents women in first batch of Agniveers

भारतीय नौदलात अग्निवीरांच्या भरतीच्या पहिल्या तुकडीत 20 टक्के जागांवर महिला अग्निवीरांची भरती केली जाणार आहे. एवढेच नाही तर या भरती होणाऱ्या महिला अग्निवीरांना नौदल युद्धनौका, पाणबुड्यांपासून ते इतर अनेक विभागांमध्येही तैनात करणार आहे. वायुसेना आणि लष्करानंतर आता नौदलातही मोठ्या संख्येने युवक अग्निवीर योजनेच्या माध्यमातून भरतीसाठी नोंदणी करत आहेत. ज्यात महिला उमेदवारांचाही समावेश आहे. यात आत्तापर्यंत 10 हजारांहून अधिक महिलांनी भरतीसाठी अर्ज केले आहेत.

नौदलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, अग्निवीर भरतीसाठी नोंदणीचा वेळ अपेक्षेनुसार आहे. यात महिला उमेदवार देखील स्वारस्य दाखवत आहेत. नौदलाने अग्निवीर म्हणून प्रथमच महिलांना सेलर म्हणून भरती करण्याची तयारी केली आहे. दरम्यान अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीत 20 टक्के जागांवर महिलांची भरती केली जाईल, या महिलांना प्रशिक्षणानंतर युद्धनौका, पाणबुडी आणि नौदलाच्या स्थायी सेलरप्रमाणे इतर विभागात नियुक्त केले जाईल.

हेही वाचा : अग्निवीर भरती प्रक्रियेची अधिसूचना जारी, आठवी पास विद्यार्थी करू शकतो अर्ज

पहिल्या वर्षात नौदलात सुमारे 3000 अग्निवीरांची होणार भरती

अग्निपथ योजनेंतर्गत नौदल पहिल्या वर्षी सुमारे 3000 अग्निवीरांची भरती करेल, यात पहिल्या तुकडीत सर्वाधिक अग्निवीरांची भरती होईल. चिल्का येथील नौदल तळावर नौदल अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला प्रशिक्षण दिले जाणार आहे. या वर्षाच्या अखेरीस नौदल अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला प्रशिक्षण देण्यास सुरुवात करेल. लष्कर आणि हवाई दलातील अग्निवीरांची ऑनलाइन नोंदणी विंडो अद्याप सुरू असून, सप्टेंबर महिन्यात प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होईल.

चार वर्षांपर्यंत अग्निवीरांना सेवा बजावण्याची परवानगी

अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर म्हणून भारताच्या तीन सुरक्षा दलात सैनिक स्तरावर चार वर्षांसाठी सेवा बजावण्याची संधी मिळेल. चार वर्षांच्या सेवेनंतर प्रत्येक तुकडीच्या 25 टक्के अग्निवीरांना विहित प्रक्रियेनुसार तिन्ही सेवांमध्ये कायमस्वरूपी भरती करुन घेतले जाईल, तर 75 टक्के अग्निवीर बाहेर पडून करिअरचा पर्यायी मार्ग निवडतील. केंद्र सरकारच्या अनेक मंत्रालयांनी PSU पासून सर्व राज्य सरकार आणि कॉर्पोरेट जगताने अग्निवीरांना चार वर्षांनंतर सैन्यातून परतल्यावर त्यांच्या संस्थांच्या नोकरीत प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे.


देशात मान्सून सक्रिय , महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी