अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीच्या 100 पदांसाठी अडीच लाख महिलांचा अर्ज, ऑक्टोबरपासून सुरु होणार रॅली

Agnipath scheme two and half lakh woman applied for 100 posts in army military police 11 rallies from october

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेअंतर्गत आर्मीच्या कोर ऑफ मिलिट्री पोलीस पदाच्या (CMP)100 रिक्त जागांसाठी सुमारे 2.5 लाख महिलांनी अर्ज केल्याची माहिती एका अधिकृत आकडेवारीनुसार माहिती समोर आली आहे. सीएमपी ही आर्मीची एकमेव शाळा आहे जी अधिकारी पदापेक्षा खालच्या महिलांची भरती करते. महिला लष्करी पोलीस कर्मचारी गर्दी नियंत्रण, तपास, काउंटर इनसर्जन्सी, सेरेमोनियल ड्युटीमध्ये तैनात आहेत. या प्रकरणाशी परिचित असलेल्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अग्निपथ योजनेंतर्गत लष्करी भरतीला मिळालेला प्रतिसाद आतापर्यंत उत्साहवर्धक आहे. तो वेगळा नाही. अग्निपथ भरती योजनेत पूर्वीच्या भरतीप्रमाणेच मानके राखण्यात आली आहेत.

एका उच्च सैन्य अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, अग्नवीर महिला भरतीला मिळालेला प्रतिसाद जबरदस्त आहे. सीएमपीमध्ये 100 रिक्त जागांसाठी सुमारे 2.5 लाख महिला उमेदवारांनी अर्ज केला आहे. त्यांच्यासाठी 11 रॅलींचे नियोजन करण्यात आले असून ते ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.

यापूर्वी 100 महिलांच्या पहिल्या तुकडीने 2020 मध्ये कोर ऑफ मिलिटरी पोलिस सेंटर अँड स्कूल, बेंगळुरू येथे प्रशिक्षण घेतले आणि 2021 च्या मध्यात देशभरातील विविध लष्करी तुकड्यांमध्ये त्यांना तैनात करण्यात आले. दरम्यान सीएमपीमधील महिलांच्या दुसऱ्या तुकडीची भरती प्रक्रिया कोरोना महामारीमुळे थांबवण्यात आली होती.

अग्निपथ योजनेंतर्गत, आता 2.5 लाख अर्जदारांपैकी 100 महिलांचे अर्ज शॉर्टलिस्ट करून लष्करी पोलिसांमध्ये भरती केले जाईल. त्यांचे प्रशिक्षण पुढील वर्षी मार्चमध्ये सुरू होईल.

लष्करी पोलिसांमध्ये महिलांचा समावेश करण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा डिसेंबर 2017 मध्ये मंजूर करण्यात आला आणि जानेवारी 2019 मध्ये केंद्र सरकारची मंजुरी मिळाली.दरवर्षी सीएमपीमध्ये महिलांना सामील करून घेण्यासाठी लष्कराची ही योजना आहे. जेणेकरून सुमारे 17 वर्षांत एकूण 1,700 महिला कर्मचारी म्हणजे 20 टक्के महिला लष्करी पोलिस दलात भरती केल्या जातील, आत्तापर्यंत नौदल आणि भारतीय हवाई दलात (IAF) खालच्या दर्जाच्या अधिकार्‍यांमध्ये महिला नाहीत.

दरम्यान नौदलानेही यावर्षी जूनमध्ये अग्निपथ योजनेंतर्गत सर्व विभागांमध्ये महिला खलाशांची भरती करणार असल्याची घोषणा केली होती. अग्निपथ योजनेंतर्गत नौदलाच्या भरतीसाठी सुमारे 9.55 लाख उमेदवारांनी नोंदणी केली आहे, त्यापैकी सुमारे 82,000 महिला अर्जदार आहेत. ताज्या अधिकृत आकडेवारीनुसार, भारतीय सैन्यात 40,000 रिक्त पदांसाठी एकूण 35 लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या वर्षाच्या अखेरीस अग्निपथ योजनेअंतर्गत सैनिकांच्या भरतीसाठी 96 रॅली काढण्याची लष्कराची योजना आहे. या 96 रॅलींपैकी 30 पूर्ण झाल्या असून 12 प्रगतीपथावर आहेत. उर्वरित रॅली 2022 च्या अखेरीस पूर्ण करायच्या आहेत. लष्करातील अग्निवीरांच्या सुरुवातीच्या तुकड्यांचे प्रशिक्षण जानेवारी 2023 पर्यंत सुरू होणार आहे.


भारतात शांतता संविधानामुळे नाही, हिंदुंमुळे; सर्वोच्च न्यायालयाचे वकिल अश्विनी उपाध्यायांचे मत