Homeदेश-विदेशAgra News : जिभेचे चोचले, घटस्फोटापर्यंत पोहोचले; आग्र्यातील दाम्पत्याची कथा तुम्हीही वाचा

Agra News : जिभेचे चोचले, घटस्फोटापर्यंत पोहोचले; आग्र्यातील दाम्पत्याची कथा तुम्हीही वाचा

Subscribe

हॉटेलचे खाणे ऑनलाइन मागवून खाण्याची चटक लागलेल्या महिलेला तिच्या पतीने घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये हे प्रकरण घडल्याचे समोर आले आहे.

आग्रा : सध्या ऑनलाइनचा काळ सुरू आहे. काहीही मागवायचे असले तरी लोक ऑनलाइन ऑर्डर देतात आणि त्यांना हवी असलेली गोष्ट त्यांना घरपोच मागवतात. त्यामुळे हल्ली एखादी गोष्ट खावीशीज जरी वाटली तरी ती सहजपणे मागविण्यात येते. पण अनेक लोकांना मात्र याची ऑनलाइन जेवण मागवण्याची चटकच लागल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारची विशेषतः हॉटेलचे खाणे ऑनलाइन मागवून खाण्याची चटक लागलेल्या महिलेला तिच्या पतीने घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये हे प्रकरण घडल्याचे समोर आले आहे. पतीने ऑनलाइन जेवण ऑर्डर न केल्यामुळे या नवरा-बायकोमध्ये इतका वाद झाला की, यांनी थेट काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. (Agra news dispute between husband and wife over constant online food ordering led to divorce)

मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथील रहिवासी असलेल्या या नवरा-बायकोचे 2024 मध्ये लग्न झाले होते. दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केले. लग्नानंतर काही महिने सगळं व्यवस्थित सुरू होते. पण एक दिवस पतीने त्याच्या पत्नीसाठी ऑनलाइन जेवण मागवले. ऑनलाइन मागवलेल्या जेवणाची चव त्या पत्नीला इतकी आवडली की, ती दररोज नवऱ्याकडे हॉटेलमधून जेवण मागविण्याची मागणी करू लागली. पण दररोज बाहेरचे पदार्थ किंवा जेवण केल्याने तब्येत खराब होऊ शकते. त्यामुळे तू घरीच जेवण बनव, असे नवऱ्याने त्याच्या बायकोला समजावले. परंतु, ती त्याचे काहीच ऐकण्यास तयार नव्हती.

हेही वाचा… Maha Kumbh 2025 : महाकुंभातील स्नानासाठी पंतप्रधान मोदींचा अनोखा लूक; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

पती बाहेरून जेवण मागवण्यास तयार नसल्याने पत्नीला खूप राग येऊ लागला. या कारणामुळे या दाम्पत्यात खटके उडू लागले. पण एक दिवस या दोघांमधील वाद इतका वाढला की, दोघांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे पत्नी संतापून तिच्या माहेरी निघून देली. ज्यानंतर ती गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा सासरी आलेली नाही. या प्रकरणाची तक्रार अखेर पोलिसांत करण्यात आली. पण पोलिसांनी हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्राकडे वर्ग केले. या केंद्रात पती-पत्नी दोघांचेही समुपदेशन करण्यात आले. समुपदेशक डॉ. सतीश खिरवार यांनी सांगितले की, एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये या जोडप्याचे 2024 मध्ये लग्न झाले आणि तो तरुण एका खासगी कंपनीत नोकरी करतो.

समुपदेशनादरम्यान, तरुणाने सांगितले की, एकदा मी ऑनलाइन जेवण मागवले होते. दोघांनी एकत्र जेवण केले. पण बायको रोज ऑनलाइन जेवण मागवू लागली. त्यामुळे मी माझ्या पत्नीला सांगितले की, दररोज बाजारातील अन्न खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, म्हणून तू घरीच जेवण बनव. पण पत्नीने घरी जेवण बनवण्यास नकार दिला आणि आमच्यामध्ये भांडण झाली. यानंतर तिने तिच्या माहेरच्यांना फोन केला आणि गेल्या दोन महिन्यांपासून ती माहेरीच राहात आहे. पण माझी तब्येत बरी नव्हती आणि म्हणून मी पतीला बाहेरून जेवण मागवण्यास सांगितले, पण माझा नवरा माझ्याशी भांडू लागला, असे महिलेकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणात सध्या दोघांचेही घटस्फोटापासून मन परिवर्तन करण्यात आले आहे. समुपदेशाने केंद्राने पत्नीला घरी जेवण बनवण्यास आणि पतीला कधीतरी बाहेरून जेवण मागणवण्याचा सल्ला देत यांच्यातील वाद मिटवला आहे.