Helicopter Crash: शहीद पृथ्वी सिंग ३१ वर्षांनी रक्षाबंधानाला घरी आले होते, अपघाती मृत्यूने बहिणींना दु:ख अनावर

शहीद पृथ्वी हे सहावीत असताना सैनिकी शाळेत भर्ती झाले होते.

agra wing commander Prithvi Singh came home for Rakshabandhan after 31 years
Helicopter Crash: शहीद पृथ्वी सिंग ३१ वर्षांनी रक्षाबंधानाला घरी आले होते, अपघाती मृत्यूने बहिणींना दु:ख अनावर

कुन्नर येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान वयाच्या केवळ ४२व्या वर्षी पृथ्वी सिंह शहीद झाले. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पृथ्वी सिंह हे तब्बल ३१ वर्षांनी रक्षाबंधनासाठी घरी आले असल्याचे त्यांच्या बहिणीनी सांगितले. पृथ्वी सिंह यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या चार बहिणी आणि आई वडिल,पत्नी आणि दोन मुले आहेत. चार मोठ्या बहिणींचे पृथ्वी हे एकूतलते एक बंधू होते. त्यांच्या मोठ्या बहिणीनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षांनी पृथ्वी रक्षाबंधनासाठी घरी आला होता. दुपारी हेलिकॉप्टर क्रॅश झाले तेव्हा त्यांनी पृथ्वी यांना फोन केला तेव्हा त्यांचा फोन स्विच ऑफ आला. पृथ्वी यांच्या पत्नी कामिनी यांच्याशी संपर्क साधला तेव्हा आम्हाला या घटनेची माहिती मिळाली आणि आमच्या पायाखालची जमिनच सरकली.

शहीद पृथ्वी हे सहावीत असताना सैनिकी शाळेत भर्ती झाले होते. तिथूनच ते एनडीएसाठी सिलेक्ट झाले. २०००मध्ये त्यांनी भारतीय वायुसेनेत प्रवेश केला. पृथ्वी सिंह हे सध्या विंग कमांडर म्हणून कार्यरत होते. कोयम्बतूर जवळच्या एअरफोर्स स्टेशनवर ते तैनात होते. २००७मध्ये पृथ्वी यांनी वृदांवन येथील कामिनी यांच्याशी झाला. पृथ्वी यांना आराध्या नावाची १२ वर्षांची मुलगी आहे तर अविराज नावाचा नऊ वर्षांचा मुलगा आहे.

विंग कमांडर पृथ्वी सिंह यांनी एअरफोर्स जॉइन करण्याआधी त्यांची पहिली पोस्टिंग हैद्राबदमध्ये झाली होती. त्यानंतर ते गोरखपूर,गुहावटी,ऊधमसिंह नगर,जामनगर,अंदमान निकोबारसह इन अनेक एअरफोर्स स्टेशन्सवर करण्यात आली होती. त्यांनी एक वर्ष ट्रेनिंगसाठी सूदानला देखील पाठवण्यात आले होते.


हेही वाचा – CDS : बिपीन रावत सांभाळत होते ते CDS पद नेमकं काय आहे? त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात?