राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून ७०० कोटींची मदत, कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची घोषणा

समितीने केंद्र सरकारला दिलेल्या अहवालाच्या आधारावर केंद्राने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ७०१ कोटींचा निधी मंजूर केला

Agriculture Minister Narendra Singh Tomar announces Rs 700 crore assistance from Center for flood-hit farmers in the state

राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या संकटामध्ये शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्य सरकारने अद्यापही कोणतंही मदत पॅकेजची घोषणा केली नाही आहे. मात्र केंद्र सरकारने राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७०० कोटी रुपयांची मदत घोषित केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत या पॅकेजबाबतची माहिती दिली आहे. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतकऱ्यांचे दरड आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. समिती स्थापित करुन आलेल्या अहवालानुसार मदत जाहीर केली असल्याचे तोमर यांनी सांगितले आहे.

लोकसभेमध्ये एका प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ७०० कोटी रुपये दिले असल्याची माहिती दिली आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात उद्भवलेल्या संकटात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. शेतकऱ्यांसाठी ७०० कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले असल्याचे नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांना पीकविमा योजनेअंतर्गत ७०१ कोटींची घोषणा करण्यात आली आहे. ही मदत शेतकऱ्यांना पीकविमा योजनेअंतर्गतच दिली जाणार आहे.

समितीच्या अहवालानुसार मदत

राज्यात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीविषयी राज्य सरकारने केंद्राला माहिती दिली होती. राज्य सरकारच्या माहितीच्या आधारावर केंद्र सरकारने मंत्रालयीन समिती स्थापित केली होती. या समितीने राज्यातील पूरपरिस्थितीचा दौरा करुन आढावा घेतला. समितीने केंद्र सरकारला दिलेल्या अहवालाच्या आधारावर केंद्राने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ७०१ कोटींचा निधी मंजूर केला आहे. अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी दिली आहे.

विरोधी पक्षाकडून सभागृहात पाचव्या दिवशीही हंगामा, गदारोळ सुरु होता. लोकसभा अध्यक्षांनी मध्यस्थिती करुन कामकाज पुन्हा चालु केले यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी समितीबाबत माहिती देऊन राज्याला मदत मंजूर केली असल्याची माहिती दिली आहे.