Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Pawar shah meet buzz : पवार - शहा मुव्हमेंटच्या नोंदी ठेवू नका,...

Pawar shah meet buzz : पवार – शहा मुव्हमेंटच्या नोंदी ठेवू नका, अहमदाबाद पोलिसांना होते आदेश

Related Story

- Advertisement -

अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. पत्रकार परिषदे दरम्यान शरद पवार आणि अमित शहा यांच्यातील भेटीच्या प्रश्नावर अमित शहांनी दिलेल्या उत्तरामुळे महाराष्ट्रापासून ते दिल्लीच्या राजकारणात एक वेगळेच वळण मिळाले आहे. सर्वच गोष्टी सार्वजनिक करता येत येत नाहीत, असे सूचक वक्तव्य केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केले होते. अहमदाबादमध्ये बिलेनिअर घरातील डिनर डिप्लोमसी ही सध्या राजकारणात चांगलीच तापू लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत बिलेनिअरच्या घरीच अमित शहांना जेवणासाठी शनिवारी भेटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर डिनर डिप्लोमसीवर मात्र अनेक प्रकारच्या तर्क वितर्कांनी जोर धरला आहे. महत्वाच म्हणजे या भेटीबाबतची अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. अहमबदाबाद पोलिसांनाही या भेटी दरम्यानच्या केंद्रीय गृहमंत्री यांच्या मुव्हमेंटची ठेवू नका असेही आदेश देण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे बिलेनिअर यांच्या घरी पवार अमित शहा येण्याच्या पाऊण तास आधीच पोहचले होते.

बिलेनिअर  यांच्या घरी केंद्रीय गृहमंत्री स्वतः ड्राईव्ह करत गेले होते. त्यासाठी अहमदाबाद पोलिसांना स्पेशल अशी व्यवस्था करण्याचेही आदेश देण्यात आले होते अशी माहिती एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने दिली आहे. राष्ट्रवादीकडून या भेटीबाबतचे वृत्त याआधीच फेटाळण्यात आले आहे. शरद पवार हे बिलेनिअर यांच्या घरी अमित शहा येण्यापूर्वीच ४५ मिनिटे आधीच पोहचले होते. पवारांच्या जवळपास पाऊण तास हजेरीनंतर अमित शहा त्याठिकाणी पोहचले. या डिनर डिप्लोमसीचा मेन्यू हा शाकाहारी ठेवण्यात आल्याचे कळते. मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनी पवारांच्या मर्जीतले असलेल्या अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर या डिनर डिप्लोमसीकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. परमबीर सिंह लेटर बॉम्ब प्रकरणामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्या दरम्यानच डिनर डिप्लोमसीमुळे आणि अमित शहा यांच्या सूचक प्रतिक्रियेमुळे सगळ्यांचा भुवया उंचावल्या आहेत.

- Advertisement -

अमित शहा यांची पश्चिम बंगालच्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अमित शहा यांनी पवारांसोबतच्या बैठकीवर सूचक प्रतिक्रिया दिली होती. सर्वच गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात असे सांगितल्यानेच त्याचे पडसाद हे महाराष्ट्राच्या राजकारणतही उमटले होते. महाराष्ट्रातही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे सांगत हे वृत्त फेटाळण्यात आले. तर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीही या भेटीबाबतचे वृत्त फेटाळताना अफवांची धुळवड थांबवा असे आवाहन केले. तर महाराष्ट्र भाजपकडूनही या प्रकरणावर प्रतिक्रिया येतानाच पक्षश्रेष्ठी सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया देण्यात आली. तर दुसरीकडे कॉंग्रेसने मात्र या भेटीचा तपशील हा सार्वजनिक होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे.

पवार- शहा – पटेल बैठक झाली नाही सांगणारे दावे

- Advertisement -

 


 

- Advertisement -