Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश गुजरातेत अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या बापाने पोटच्या मुला-मुलीचा घेतला बळी

गुजरातेत अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या बापाने पोटच्या मुला-मुलीचा घेतला बळी

Subscribe

वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली असली तरी आरोग्याशी संबंधित अडचणींबद्दल देशाच्या काही भागांमध्ये अजूनही अंधश्रद्धा पाळली जाते. परिणामी, वेळीच उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो.

वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली असली तरी आरोग्याशी संबंधित अडचणींबद्दल देशाच्या काही भागांमध्ये अजूनही अंधश्रद्धा पाळली जाते. अनेक ठिकाणी उपचारांसाठी डॉक्टरांऐवजी भोंदू बाबा किंवा मांत्रिक यांची मदत घेतली जाते. परिणामी, वेळीच उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. अशीच एक घटना राजकोटमध्ये घडलीय. नेपाळी कुटुंबातील चौकीदाराने अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन पत्नी, मुलगा आणि मुलीवर अमानुष हल्ला केला आहे. यात पोटच्या मुलाचा जीव गेल्याची घटना घडलीय.

राजकोटमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. सर्वांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच त्या निष्पाप मुलाचाही बेडवरच मृत्यू झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजकोटमधील इंदिरा सर्कलजवळील अजिंठा अपार्टमेंटमध्ये हे कुटूंब राहत होतं. यातील अंधश्रद्धाळू पिता वॉचमन म्हणून काम करत होता. या नेपाळी व्यक्तीने हा जीवघेणा खेळ खेळला. पोलिसांनी सांगितले की, प्रेम शाहू नावाच्या नेपाळी पित्याने अंधश्रद्धेतून पहाटे पत्नी बसंती शाहू (वय 25), मुलगा नियत शाहू (वय 4) आणि मुलगी लक्ष्मी शाहू (वय 3 महिने) यांच्यावर चाकूने हल्ला केला.

- Advertisement -

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तीनही माता-पुत्रांना तात्काळ उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे कर्तव्यावरील डॉक्टरांनी निष्पाप मुलगी लक्ष्मी हिला मृत घोषित केल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच युनिव्हर्सिटी पोलिस स्टेशनचे पीआय एबी जडेजा यांच्यासह ताफ्याने मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला.

प्राथमिक तपासात पोलिसांना कळले की, मारेकरी प्रेम साहू हा गेल्या पाच वर्षांपासून राजकोटमध्ये राहत होता. आज पहाटे अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन त्याने ही हत्या केली. त्याने आपल्या पत्नीला सांगितले की आज माताजीने आज्ञा केली आहे की तुम्हा सर्वांना मारायचे आहे. यानंतर त्याने घरातील सदस्यांवर चाकूने हल्ला केला, ज्यामध्ये निष्पाप भाऊ आणि बहिणीचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी बसंती देखील गंभीर अवस्थेत दाखल आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -