घरताज्या घडामोडी'या' महिलेने मोदींना भेट म्हणून देण्यासाठी तयार केले चॉकलेटचे 'राम मंदिर'

‘या’ महिलेने मोदींना भेट म्हणून देण्यासाठी तयार केले चॉकलेटचे ‘राम मंदिर’

Subscribe

अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयार पूर्ण झाली आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी या भूमिपूजनच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दरम्यान अहमदाबादमध्ये भगवान राम यांचे चॉकलेट मंदिर बांधले गेले आहे. हे मंदिर रामभक्त शिल्पा भट्ट यांनी तयार केले आहे. शिल्पा भट्ट या पेशाने चॉकलेट तयार करतात. चॉकलेटचे राम मंदिर तयार करण्यासाठी शिल्पा यांना १५ किलो चॉकलेट लागले.

हे चॉकलेटचे मंदिर अयोध्येतील राम मंदिर सारखेच दिसते. १५ किलो चॉकलेटचे हे मंदिर तयार करण्यासाठी १२ तास शिल्पा यांना लागले आहेत. शिल्पा भट्ट म्हणाल्या की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे मंदिर भेट म्हणून देण्याची इच्छा आहे. पंतप्रधानांच्या इच्छा शक्तीमुळे आज राम मंदिर उभारण्यासाठी भूमिपूजन होणार आहे. हे चॉकलेट मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचले नाही तर भगवान रामाचा प्रसाद म्हणून लहान मुलांमध्ये वाटले.’ अशा प्रकारे शिल्पा भट्ट यांना अनेक वेगवेगळ्या गोष्टी चॉकलेटपासून तयार केल्या आहेत. गेल्या ४ वर्षापासून त्या चॉकलेटपासून वस्तू तयार करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – राम मंदिर भूमिपूजनास पंतप्रधान मोदी अयोध्या दौर्‍यावर; ‘या’ नेत्यांनाही दिलं जाणार आमंत्रण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -