घरदेश-विदेशदिल्लीतील AIIMS हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारून डॉक्टरची आत्महत्या

दिल्लीतील AIIMS हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारून डॉक्टरची आत्महत्या

Subscribe

दिल्लीतील एम्स हॉस्टेलमध्ये एका मेडिकलच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एम्स हॉस्टेलच्या रुम नं. १९ छतावरून या विद्यार्थ्यांने उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. विकास या २२ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. विकास हा बंगळुरू येथे राहणारा होता. सोमवारी सायंकाळी ६ वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली असून एम्समध्ये एका विद्यार्थ्याने टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये तातडीने नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा –

चाकमान्यानू लक्ष देवा! कोकणात जाणार्‍यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -