घरताज्या घडामोडीभारतात मुस्लिम नाही तर हिंदू व्होट बँक आहे अन् राहील, असदुद्दीन ओवैसींचे...

भारतात मुस्लिम नाही तर हिंदू व्होट बँक आहे अन् राहील, असदुद्दीन ओवैसींचे वक्तव्य

Subscribe

भारतात कधीहीही मुस्लिम व्होट बँक नव्हती तर हिंदू व्होट बँक आहे आणि राहील असे वक्तव्य ऑल इंडिया मजलिस-ए-मुस्लिमीन (एआईएमआईएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केल आहे. उत्तर प्रदेशमधील सहारनपुरमध्ये आयोजित एका सभेमध्ये ओवैसी यांनी असे वक्तव्य केलं असून त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर केला आहे.

एआईएमआईएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी सभेत म्हटलं आहे की, जर २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एआईएमआईएम लढली नाही तर भाजप कशी जिंकली? २०१७मध्ये विधानसभा निवडणूकमध्ये एआईएमआईएम २५-२७ जागांवर निवडणूक लढवली आणि भाजप ३०० जागांवर विजयी झाली. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये सपा-बसपा युतीमध्ये निवडणूक लढले आणि फक्त १५ जागांवर विजयी झाले. बाकी जागांवर भाजप कशी जिंकली? असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.

- Advertisement -

भारताच्या राजकारणात मुस्लिम व्होट बँकला काही महत्त्व नाही आहे. भारतात मुस्लिम व्होट बँक कधीही राहिले नाही. यामुळे संसदेत नेहमी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतात केवळ हिंदू व्होट बँकच महत्त्वाचे समजण्यात आले आहे. जर मुस्लिम व्होट बँक असतील तर देशाच्या संसदेत केवळ २३-२४ खासदारच जिंकले नसते. देशात कधीच मुस्लिम व्होट बँक राहिली नाही असे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मला नेता होण्याची इच्छा नाही

असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे की, जर मला कोणी वैरी मानत असेल तर त्यांना सांगू इच्छितो की मला मुस्लिम नेता होण्याची इच्छा नाही आहे. परंतु मला असे वाटते की, आपल्या पुर्वजांनी देशासाठी जी लाढाई लढली. त्याच देशात आपल्याला काही महत्त्व नाही राहिले. आपल्या अधिकारांसाठीही आपल्याला भीक मागाली लागते असे एआईएमआईएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी म्हणाले.


हेही वाचा : Sachin Vaze: मुंबई पोलिसांनी घेतली सचिन वाझेची कस्टडी


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -