घरताज्या घडामोडीआयेशा आत्महत्या प्रकरण: असदुद्दीन ओवैसींची हुंडा प्रथेवर सडकून टिका

आयेशा आत्महत्या प्रकरण: असदुद्दीन ओवैसींची हुंडा प्रथेवर सडकून टिका

Subscribe

आयेशा आत्महत्या प्रकरणी असदुद्दीन ओवैसी यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. 'आपल्या पत्नीवर अत्याचार करणारे पुरुष हे पुरुष म्हणवून घेण्याच्या लायकीचे नाहीत.

गुजरातच्या साबरमती नदीत उडी मारुन आत्महत्या करणाऱ्या आयेशा या तरुणीचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समाजात असलेल्या हुंडा प्रथेने आयेषाचा बळी घेतला. वैवाहिक आयुष्यात हुंड्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आयेषाने आत्महत्या केली. आयशाच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या तिच्या नवऱ्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आयेशाच्या आत्महत्येनंतर तिचा नवरा आरीफ खानला राजस्थानमधून अटक करण्यात आली. आयशाने आत्महत्येपूर्वी केलेला व्हिडिओपाहून सर्वांनाचे मन हादरुन गेले आहे. अवघ्या २३ वर्षांने आयेशाने हसत हसत आपली जिवनयात्रा संपवली. या घटनेवर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी हुंडा घेणाऱ्यांवर कडक शब्दात टिका केली आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी हुंडा प्रथेवर सडकून टिका करताना मुलींनी या प्रथेविरुद्ध उभ्या रहा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले असदुद्दीन ओवैसी?

आयेशा आत्महत्या प्रकरणी असदुद्दीन ओवैसी यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. ‘आपल्या पत्नीवर अत्याचार करणारे पुरुष हे पुरुष म्हणवून घेण्याच्या लायकीचे नाहीत. पत्नीवर अत्याचार करणारे नामर्द असतात पुरुषत्व म्हणून घेण्याची त्याची लायकी नसते. निरागस मुलीवर अत्याचार करणाऱ्या तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या कुटुंबियांना लाज वाटायला हवी. आपल्या बायकोला मारणे, तिच्याकडून हुंडा मागणे ही मर्दानगी नाही’, अशा कडक शब्दात टिका ओवैसी यांनी केली. त्याचबरोबर ‘इस्लाममध्ये हुंड्यासारखा शब्दच अस्तित्वात नाही, लोकांनी मात्र हुंड्याचा धंदा सुरु केला आहे’, असेही ओवैसी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

आयेषाचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ पाहून सर्वांचीचं मने हेलावून गेली आहेत. संपूर्ण देशातून आयेशाच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. २०१८मध्ये आयेशाचे लग्न राजस्थानमध्ये राहणाऱ्या आरिफ खानसोबत झाले होते. लग्नानंतर आयेशाच्या सासरच्या कुटुंबियांनी तिच्या वडिलांकडे हुंड्याची मागणी केली होती. सतत होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आयेशाने तिचा जीवनप्रवास संपवला.


हेही वाचा – बापरे! कुटुंबियांकडून अंत्यसंस्काराची तयारी अन् मृतदेहात आला जीव

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -