घरदेश-विदेशहलालासाठी AIMIM च्या नेत्याचा पूर्व पत्नीवर दबाव, ९ वर्षांनी मित्रासह पोहचले घरी

हलालासाठी AIMIM च्या नेत्याचा पूर्व पत्नीवर दबाव, ९ वर्षांनी मित्रासह पोहचले घरी

Subscribe

आरोपींनी महिलेला जीवे मारण्याची धमकीही दिली. आरोपी महिलेला म्हणाले की, जर तिने त्याच्या मित्रासोबत हलाला आणि त्याच्याशी पुन्हा लग्न केले नाही तर तो तिला ठार मारेल.

देशात तिहेरी तलाक कायदा लागू झाल्यानंतरही मुस्लिम महिलांवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नसून सध्या राजधानी दिल्लीतील जामिया नगरमध्ये एक संतपाजनक घटना घडली असून 9 वर्षांपूर्वी पत्नीपासून घटस्फोट घेतलेला एक व्यक्ती आपल्या मित्रासह महिलेच्या घरी गेला आणि हलाला करण्यासाठी पूर्व पत्नीवर दबाव देऊ लागला.

हलाला न केल्यास दिली जीवे मारण्याची धमकी

एवढेच नाही तर आरोपींनी महिलेला जीवे मारण्याची धमकीही दिली. आरोपी महिलेला म्हणाले की, जर तिने त्याच्या मित्रासोबत हलाला आणि त्याच्याशी पुन्हा लग्न केले नाही तर तो तिला ठार मारेल. दरम्यान, हा गुन्हा जामिया नगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले असून पीडितेच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पोलिस पुढील तपास सुरू करत आहे.

- Advertisement -
खोट बोलून केला महिलेशी विवाह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाझुद्दीनने स्वतःला घटस्फोटित असल्याचे सांगून जानेवारी 2012 मध्ये एका महिलेशी लग्न केले होते. नंतर महिलेला कळले की ती घटस्फोटित नाही. महिलेचा आरोप आहे की रियाझुद्दीन पहिल्या पत्नीसह तिला त्रास देत असे. यादरम्यान, महिलेने एका मुलालाही जन्म दिला. 2012 च्या शेवटी आरोपींनी पीडितेला तिहेरी तलाक दिला.

महिलेने पोलिसांना सांगितले, ‘9 वर्षांनंतर, 19 ऑगस्ट 2021 च्या रात्री, तो एका मित्रासह माझ्या घरी आला आणि मला त्याच्या मित्रासोबत हलाला करायला सांगितले आणि त्याच्याशी पुन्हा लग्न करण्यास सांगितले. जेव्हा मी त्याला असे करण्यास नकार दिला तेव्हा त्याने माझ्यावर जबरदस्ती केली आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली.

- Advertisement -
 आरोपी काय म्हणाले

रियाझुद्दीन खान एआयएमएमआय उत्तर प्रदेशचे सचिव असल्याचे महिला सांगते. तर आरोपी म्हणतो की त्याने एका आठवड्यापूर्वी पक्षातून राजीनामा दिला आहे. आरोपी म्हणाला की,संबधीत महिला खोटे आरोप करून आपली राजकीय कारकीर्द खराब करु इच्छित आहे आणि तसेच ही महिला त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहे.


हे हि वाचा – तालिबान्यांच्या ताब्यानंतर २८ दिवसांनी पाकिस्तान एअरलाइन्सचे विमान काबूल विमानतळावर झाले लँड!

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -