Waseem Rizvi : वसीम रिझवीला चप्पल फेकून मारणाऱ्यांना ११ लाखांचं बक्षिस, ‘या’ व्यक्तीने केली घोषणा

हिंदू धर्माचा स्वीकार करणारे उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी उर्फ जितेंद्र नारायण सिंह त्यागी यांना सतत जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तेलंगणातील फिरोज खान आणि राशीद खान या काँग्रेस नेत्यांनी रिझवींवर ५० लाख आणि २५ लाखांचे बक्षिस ठेवले आहे. त्यानंतर आता मुरादाबादमधील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनच्या नेत्याने वसीम रिझवीला चप्पल फेकून मारणाऱ्यास ११ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

मुरादाबाद शहरातील एआयएमआयएमचे अध्यक्ष वकी रशीद यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं की, रीझवी सांप्रदायिक दंगल घडवण्यासाठी योजना आखत आहे. एका विशिष्ट गटाच्या इशाऱ्यामुळे त्यांच्या वक्तव्यामुळे दोन समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एआयएमआयएम नेत्याने आरोप केला की रिझवी हे सर्व त्यांच्या नावावर दाखल असलेल्या अनेक गुन्हेगारी खटल्यांतून दिलासा मिळवण्यासाठी करत आहेत. रिझवी हे सर्व त्यांच्या नावावर दाखल असलेल्या अनेक गुन्हेगारी खटल्यांतून दिलासा मिळवण्यासाठी करत आहेत. असं एआयएमआयएमच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

गेल्या ८ महिन्यापासून इस्लाम धर्माचा अनादर करत आहेत. आम्ही सर्व धर्माचा आदर करतो. पण ते आमच्या धर्माचा आदर करत नाहीत. त्यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. परंतु येथून पुढे त्यांनी आमच्या धर्माचा अनादर केला तर त्यांची हत्या देखील करू, असं इशारा काँग्रेसचे नेते रशीद खान यांनी दिला आहे.

वकी रशीद म्हणाले की, वसीम रिझवी यांच्याविरोधात तपास व्हायला हवा. परंतु अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार आलेली नाही, त्यामुळे कारवाई झाली नाही. असं पोलिसांनी म्हटलं आहे. वास्तविक, रिझवी यांनी अलीकडेच इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे.


हेही वाचा : दिवाळखोरीमुळे बँक बुडाल्यावरही ग्राहकांना किती पैसे मिळणार? जाणून घ्या…