‘हम दो हमारे दो’ संकल्पना मान्य नाही, असदुद्दीन ओवैसींनी सांगितलं कारण

ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की 2030 पर्यंत प्रजनन दर कमी होणार आहे. त्यामुळे माझा या संकल्पनेला विरोध आहे.

Asaduddin Owaisi

गेल्या काही वर्षांत देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने लोकसंख्या नियंत्रण करण्याचं आवाहन करण्यात येतंय. मात्र, असं असतानाही AMIM चे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी हम दो हमारे दो या संकल्पनेलाच विरोध केला आहे. ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की 2030 पर्यंत प्रजनन दर कमी होणार आहे. त्यामुळे माझा या संकल्पनेला विरोध आहे. (AIMIM MP Asaduddin owaisi says i will oppose population control to mandate only 2 childrens)

ते म्हणाले की, चीनकडून झालेली चूक आपण टाळायला हवी. दोन अपत्यासंदर्भात असलेल्या कोणत्याच धोरणाला किंवा कायद्याचं मी समर्थन करणार नाही. याचा देशाला काहीच फायदा होणार नाही. देशाचा प्रजनन दर सध्या घसरत आहे. २०३० पर्यंत हा दर स्थिर होईल, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.


ओवैसी म्हणाले की, “उत्तर प्रदेशात कुठल्याही कायद्याशिवाय २०२६-३० पर्यंत अपेक्षित प्रजनन दर गाठला जाईल. उत्तर प्रदेशच्याच आरोग्य मंत्र्यांनी म्हटलं होतं की लोकसंख्या नियंत्रणासाठी देशात कोणत्याही प्रकारच्या कायद्याची आवश्यकता नाही. गर्भनिरोधकांचा वापर मुस्लिम समाजाकडूनच होत आहे. २०१६ मध्ये एकूण प्रजनन दर २.६ होती. तो आता २.३ आहे.”