घरताज्या घडामोडीविमानातील प्रवाशांना आता विनाइंटरनेट पाहता येणार मोफत OTT कंटेंट

विमानातील प्रवाशांना आता विनाइंटरनेट पाहता येणार मोफत OTT कंटेंट

Subscribe

विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विमानातून प्रवास करताना मोबाईल फोन फ्लाईट-मोडवर टाकणे बंधनकराक असते. परंतु, आता प्रवाशांना विमानात OTT कंटेंट पाहण्याची संधी मिळणार आहे. एअर एशिया इंडियाने हायपर लोकल क्लाउड प्लॅटफॉर्म शुगरबॉक्ससह नवीन भागीदारी करण्याची घोषणा केली आहे.

विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विमानातून प्रवास करताना मोबाईल फोन फ्लाईट-मोडवर टाकणे बंधनकराक असते. परंतु, आता प्रवाशांना विमानात OTT कंटेंट पाहण्याची संधी मिळणार आहे. एअर एशिया इंडियाने हायपर लोकल क्लाउड प्लॅटफॉर्म शुगरबॉक्ससह नवीन भागीदारी करण्याची घोषणा केली आहे. या भागीदारी अंतर्गत, प्रवाशांना आता AirAsia फ्लाइट्सवर मोफत OTT कंटेंट पाहण्याची संधी मिळणार आहे. (Air Asia Partners Sugarbox Launches Airflix For Inflight Experience Free Ott Content Web Series)

एअर एशिया आणि शुगरबॉक्स यांनी संयुक्तपणे एअरफ्लिक्स सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत युजर्सना 6000 तासांपेक्षा जास्त एचडी कंटेंट, 1000 हून अधिक हॉलीवूड आणि बॉलीवूड फिल्म आणि वेब कंटेंट पाहण्याची संधी मिळणार आहे. विमानातून प्रवास करताना युजर्सना बातम्या वाचणे, भारतीय वेब सिरीज पाहणे आणि खरेदी करणे असे पर्याय उपलब्ध होत नव्हते.

- Advertisement -

या प्लॅनची वैशिष्ट्ये

  • एअरफ्लिक्स सेवेसह युजर्सना इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटीशिवाय (इंटरनेटशिवाय) कंटेंटचा अनुभव घेता येणार आहे.
  • एअर एशिया आणि शुगरबॉक्सची ही सेवा पेटंट क्लाउडवर आधारित आहे.
  • युजर्सना कंटेंट पाहताना फ्लाइटमध्ये बफरिंग सारखी कोणतीही समस्या येणार नाही.
  • युजर्सना 1Gbps पर्यंत स्पीड आणि 8TB स्टोरेज मिळेल.
  • युजर्स फ्लाइटमध्येच बातम्या वाचण्यासोबत गेमिंगचा अनुभव घेऊ शकतील.
  • युजर्स ऑनलाइन शॉपिंग देखील करू शकणार आहेत.

दरम्यान, एअर एशिया इंडियासोबत ‘एअरफ्लिक्स’च्या माध्यमातून फ्लाइटचा अनुभव बदलण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भागीदारी करताना आनंद होत आहे. जागतिक स्तरावर हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. जिथे आम्ही शुगरबॉक्सच्या पेटंट क्लाउड फ्रॅगमेंट टेक्नॉलॉजीचा वापर करून क्लाउडची शक्ती फ्लाइटसाठी आणत असल्याचे शुगरबॉक्सचे सह-संस्थापक रोहित परांजपे यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – दिल्लीतील एम्स रुग्णालयावर झाला सायबर हल्ला; महत्वाची माहिती धोक्यात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -