घरताज्या घडामोडीकोरोना व्हायरसचा प्रसार हवेच्या माध्यमातून!

कोरोना व्हायरसचा प्रसार हवेच्या माध्यमातून!

Subscribe

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत ७७ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच चार लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या कोरोना व्हायरस रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लस आणि औषधासाठी संशोधन सुरू आहे. यादरम्यान अनेक संशोधकांच्या अभ्यासातून कोरोनासंदर्भात वेगवेगळे खुलासे होत आहे. दरम्यान एका अभ्यासानुसार असे समोर आले आहे की, हवेच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा होणार प्रसार हा या विषाणू प्रसाराचा प्रमुख मार्ग आहे.

एका अभ्यासानुसार जगभरातील महामारीच्या तीन प्रमुख केंद्रामध्ये विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. ११९५ मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते मारिओ जे मोलिना यांच्यासह शास्त्रज्ञांनी, चीनमधील वुहान, अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि इटलीमध्ये या तीन महामारीच्या केंद्रामध्ये कोविड-१९ प्रसाराचा मार्गांचे मूल्यांकन केले.

- Advertisement -

त्यावेळी जागतिक आरोग्य संघटना केवळ काही काळापासून संपर्कात आलेले संक्रमण रोखण्यावर भर देत आहे आणि कोरोना विषाणू हवेच्या माध्यमातून पसरत असलेल्या तथ्याकडे कानाडोळा करत आहे, अशी संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे.

पीएनएएस या जर्नलमघ्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासाच्या आधारे ते म्हणाले की, हवेमुळे होणारा प्रसार हा अत्यंत संक्रमक आहे आणि हा विषाणू पसरण्याचा मुख्य मार्ग आहे. ते पुढे म्हणाले की, यामुळे श्वासोच्छवासाद्वारे हे विषाणू शरीरात प्रवेश करू शकतात.

- Advertisement -

कोणत्याही संक्रमित व्यक्तींच्या शिंकण्यामुळे तयार झालेल्या सूक्ष्मकण हा मनुष्याच्या केसांच्या आकारा एवढे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संशोधकांच्या मते अमेरिकेत लागू केलेला सोशल डिस्टन्सिंगचा कायदा यासारखा इतर प्रतिबंधक उपाय अपुरे आहेत.

ते पुढे म्हणाले की, आमच्या अभ्यासानुसार असे दिसून आले की, कोविड-१९ या जागतिक महामारी रोखण्यास जग अपयशी ठरले कारण त्यांनी हवेतून पसरलेल्या विषाणूची तीव्रता ओळखली नाही. त्यांनी असा निष्कर्ष काढला की, सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क लावल्यामुळे रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होऊ शकते.


हेही वाचा – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सायकल असू शकते प्रमुख शस्त्र!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -