अमेरिका-चीन युद्धाच्या छायेत, यूएस एअरफोर्स जनरलच्या मेमोने उडाली खळबळ

मागील काही वर्षांपासून अमेरिका आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच अमेरिका आणि चीन युद्धाच्या छायेत असल्याची माहिती समोर आली असून यूएस एअरफोर्स जनरलच्या मेमोने खळबळ उडाली आहे. आगामी काळात अमेरिका आणि चीनमध्ये युद्ध होऊ शकते, अशी शक्यता अमेरिकेच्या फोर स्टार एअरफोर्स जनरलने व्यक्त केली आहे.

जनरल माइक मिनिहन यांनी एअरफोर्सला लिहिलेल्या मेमोत म्हटले आहे. तैवानवरून चीन आणि अमेरिका यांच्यात युद्धा पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०२५ मध्ये चीनसोबत युद्ध करू, ही भीती चुकीची सिद्ध व्हावी अशी माझी इच्छा आहे. परंतु अमेरिका आणि तैवान या दोन्ही देशांत २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होतील. त्यामुळे चीनकडून लष्करी कारवाई केली जाऊ शकते, असं मिनिहन यांनी म्हटलं आहे.

तैवान सामुद्रधुनीवर चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींवरून चीनचे हेतू स्पष्टपणे दिसत आहेत, असं अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते. चीनने गेल्या काही वर्षांत तैवानवर राजनैतिक, लष्करी आणि आर्थिक दबावही वाढवला आहे. तैवानला शांतता हवी आहे, परंतु हल्ला झाल्यास त्याला उत्तर नक्कीच दिलं जाईल, असंही ऑस्टिन यांनी म्हटलं होतं.

चीनच्या राष्ट्रपतींनी फोनवर व्यक्त केला होता आक्षेप

नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीपूर्वी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. फोनवर जिनपिंग यांनी बिडेन यांना सांगितले की, अमेरिकेने चीनचे तत्व पाळले पाहिजे. जे आगीशी खेळतात, ते स्वतःच जळून जातात, असा धमकीवजा इशारा चीनने दिला होता. याला उत्तर देताना बिडेन म्हणाले होते की, अमेरिकेने तैवानबाबतचे आपले धोरण बदललेले नाही आणि तैवानमधील शांतता बिघडवण्याच्या एकतर्फी प्रयत्नांना तीव्र विरोध आहे.


हेही वाचा : गुजरात दंगलीवरील बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर पंतप्रधान मोदींचं सूचक वक्तव्य, म्हणाले…