Kerala Air India Crash महाराष्ट्राचे लढाऊ वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यू

deepak sathe

केरळच्या कोझिकोड विमानातळावर घडलेल्या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. या वैमानिकांपैकी मुंबईचे वैमानिक दीपक वसंत साटे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सुना व मोठा आप्त परिवार आहे.

दीपक साठे हे गेल्या १५ वर्षांपासून एअर इंडियामध्ये वैमानिक होते. १९८१ साली हवाईदलात वैमानिक म्हणून रूजू झाले. त्या आधी त्यांनी पुण्याच्या एनडीएतून प्रशिक्षण घेतले होते. २००३ पर्यंत त्यांनी हवाईदलात लढाऊ वैमानिक म्हणून सेवा दिली. त्यानंतर त्यांनी २००३मध्ये त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर ते एअर इंडियामध्ये रूजू झाले. त्यांनी एअर इंडियाच्या ताफ्यातील मोठ्या आकाराचे ‘एअरबस ३१०’ हे विमान उडवले. त्यानंतर अलिकडेच ते बोइंग विमानावर स्थलांतरित झाले होते. केरळमधील अपघात हा बोइंग ७३७ विमान होते.

दीपक साठे हे कुशल लढाऊ वैमानिक होते

दीपक साठे हे हवाईदल अकादमीतील प्रशिक्षणात अग्रेसर राहिले होते. मानाची तलवार त्यावेळी त्यांनी जिंकली होती. हवाईदलातील सेवेत ते हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) चाचणी वैमानिक अर्थात टेस्ट पायलटदेखील राहिले होते.

केरळच्या कोझिकोड येथील करिपूर विमानतळावर एअर इंडियाचे एक विमान उतरत असताना रनवे वरुन घसरले. ज्यामुळे मोठा अपघात झाला. विमान घसरल्यानंतर विमानाचे दोन तुकडे झाले. हे विमान दुबईहून आले होते. विमानातील १९० प्रवाशांपैकी किती लोक जखमी झाले आहेत.  या प्रकरणी डीजीसीएने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तर मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिलीय. मदत आणि बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

कोझीकोडमध्ये विमान रनवेवरून घसरले, वैमानिकासह दोन प्रवाशांचा मृत्यू!

कोझीकोडमध्ये विमान रनवेवरून घसरले, वैमानिकासह दोन प्रवाशांचा मृत्यू!

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Friday, August 7, 2020


हे ही वाचा – कोझिकोड विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचे दोन तुकडे झाले; अपघातात वैमानिकाचा मृत्यू