घरदेश-विदेशएअर इंडियाच्या आणखी एका विमानात लाजिरवाणे कृत्य, मद्यधुंद व्यक्तीने केलं असं काही...

एअर इंडियाच्या आणखी एका विमानात लाजिरवाणे कृत्य, मद्यधुंद व्यक्तीने केलं असं काही…

Subscribe

पॅरीस-दिल्ली प्रवासात ६ डिसेंबर २०२२ रोजी ही घटना घडली. या घटनेची माहिती पायलटने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. मात्र त्या प्रवाशाने लेखी स्वरुपात महिलेची व विमान अधिकाऱ्यांची माफी मागितली. महिलेनेही त्याला माफ करत पोलीस तक्रार करण्यास नकार दिला. त्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असे विमानतळ प्रशासनाने सांगितले. 

नवी दिल्लीः प्रवाशाने विमानात एका महिलेवर लघूशंका केल्याचे प्रकरण ताजे असताना गेल्या महिन्यात एका प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत महिलेच्या चादरीवर लघूशंका केल्याची घटना समोर आली आहे. मात्र संबंधित प्रवाशाने लेखी स्वरुपात माफी मागितल्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

पॅरीस-दिल्ली प्रवासात ६ डिसेंबर २०२२ रोजी ही घटना घडली. या घटनेची माहिती पायलटने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिली. त्यानंतर त्या व्यक्तिला अटक करण्यात आली. मात्र त्या प्रवाशाने लेखी स्वरुपात महिलेची व विमान अधिकाऱ्यांची माफी मागितली. महिलेनेही त्याला माफ करत पोलीस तक्रार करण्यास नकार दिला. त्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असे विमानतळ प्रशासनाने सांगितले.

- Advertisement -

याआधी अशाच प्रकारची घटना २६ नोव्हेंबर २०२२ रोजी घडली होती. एअर इंडियाच्या विमानातील बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने महिलेवर लघुशंका केली. पीडित महिलेने त्या व्यक्तिविरोधात टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहिले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. लघूशंका करणाऱ्या प्रवाशावर कायस्वरुपी विमान प्रवासाची बंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एअर इंडियाच्या फ्लाइट AI-102 ने न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी विमानतळावरून दिल्लीला जात होती. दुपारच्या जेवणानंतर विमानातील लाइट्स बंद करण्यात आले. त्याचवेळी एक मद्यधुंद प्रवासी सीटजवळ आला आणि त्याने माझ्या अंगावर लघुशंका केली. त्यानंतरही तो प्रवासी माझ्या जवळच उभा राहिला. त्यावेळी सहप्रवाशाने समज दिल्यानंतर तो तेथून गेला. परंतु, लघुशंकेमुळे कपडे, बॅग, शूज पूर्णपणे भिजले होते. क्रू मेंबर्सना याची माहिती दिली. त्यानंतर एअर होस्टेस आली आणि जंतुनाशक फवारणी करून गेली. लघुशंका करणाऱ्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच, दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर ती व्यक्ती निघून गेली, असे पीडित महिलेने पत्रात नमूद केले आहे.

- Advertisement -

पीडित महिलेच्या पत्राची दखल घेत या घटनेच्या चौकशीसाठी एअर इंडियाने अंतर्गत समितीही स्थापन केली आहे. तसेच, या प्रवाशाला ‘नो-फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्याची शिफारसही करण्यात आल्याचे सांगितले. लघूशंका करणाऱ्या व्यक्तिला शोधण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले आहे.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -