घरदेश-विदेशAir India Handover: एअर इंडियाची मालकी आजपासून टाटा समूहाच्या हाती

Air India Handover: एअर इंडियाची मालकी आजपासून टाटा समूहाच्या हाती

Subscribe

टाटा ग्रुपने म्हटले आहे की, सुरुवातीला ते 5 फ्लाइट्समध्ये मोफत जेवण पुरवेल.

27 जानेवारी 2022 हा टाटा समूहासाठी ऐतिहासिक दिवस आहे. कारण तब्बल 69 वर्षानंतर एअर इंडियाची कमान अधिकृतपणे टाटा समूहाच्या हाती आली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी याला दुजोरा दिला आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांनी औपचारिक हस्तांतर करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर चंद्रशेखरन पुन्हा एअर इंडियाच्या मुख्यालयात गेले. जिथे हस्तांतरनाची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे  एअर इंडियाची मालकी आजपासून टाटा समूहाच्या हाती गेली आहे.

- Advertisement -

टाटा समूहाने हस्तांतरानंतर अधिकृतपणे एक निवेदन जाहीर केले आहे. या निवेदनात अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांनी म्हटले की, एअर इंडिया खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. टाटा समूहाने आजपासून एअर इंडियाचे व्यवस्थापन आणि नियंत्रण स्वत:च्या हातात घेण्यास सुरुवात केली आहे. एअर इंडिया पुन्हा टाटा समूहात परत आल्याने खूप आनंदी आहोत. तसेच ही जागतिक विमान कंपनी बनवण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. मी आमच्या ग्रुपमध्ये एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून स्वागत करतो आणि एकत्र काम करण्यास उत्सुक आहे.” समूहाने असेही म्हटले आहे की, विमान वाहतूक क्षेत्र परवडणारे आणि नागरिकांचे जीवन सुलभ” करण्यासाठी पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाशी ते सहमत आहेत.

- Advertisement -

एअर इंडियाच्या खरेदीनंतर टाटा समूह आता देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या विमान कंपनीच्या जागी आले आहे. मात्र एअर इंडिया टाटा समूहाच्या बॅनरखाली त्वरित उड्डाण करणार की नाही याची अधिकृत प्रक्रिया पूर्ण होण्यास थोडा वेळ लागेल. गेल्या वर्षी 8 ऑक्टोबर 2021 रोजी रतन टाटा यांनी त्यांच्या ट्विटद्वारे एअर इंडियाची बोली जिंकल्याची घोषणा केली. टाटा समूहाची उपकंपनी टेल्स प्रायव्हेट लिमिटेडने एअर इंडिया खरेदी करण्याचे टेंडर जिंकले होते. ही कंपनी टाटाचा एअरलाइन व्यवसाय चालवेल. एअर इंडियाची मालकी मिळवण्यासाठी टेल्सने 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती.

टाटा ग्रुपने म्हटले आहे की, सुरुवातीला ते 5 फ्लाइट्समध्ये मोफत जेवण पुरवेल. यामध्ये मुंबई-दिल्लीच्या दोन फ्लाइटची नावे AI864 आणि AI687 आहेत. याशिवाय AI945 मुंबई ते अबू धाबी आणि AI639 मुंबई ते बंगळुरू या फ्लाइटची नावे समाविष्ट आहेत. यासोबतच मुंबई-न्यूयॉर्क मार्गावर चालणाऱ्या फ्लाइटमध्ये मोफत जेवणही दिले जाणार आहे. टाटा समूहाने सांगितले की, नंतर मोफत अन्न टप्प्याटप्प्याने वाढवले ​जाईल.


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात उभारावा – राहुल शेवाळे


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -