Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी विमानात लघुशंकेच्या घटनेनंतर एअर इंडियाच्या नियमांत बदल

विमानात लघुशंकेच्या घटनेनंतर एअर इंडियाच्या नियमांत बदल

Subscribe

मागील काही दिवसांपासून विमानात प्रवाशांच्या असभ्य वर्तनाच्या घटनांमध्ये वाढ झाली. या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने प्रवासावेळी विमानात दारू उपलब्ध करून देण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.

मागील काही दिवसांपासून विमानात प्रवाशांच्या असभ्य वर्तनाच्या घटनांमध्ये वाढ झाली. या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने प्रवासावेळी विमानात दारू उपलब्ध करून देण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार, विमानातील केबिन क्रू मेंबर्सना चालाकीने प्रवाशांना दारू देण्यास सांगितले आहे. (air india modifies alcohol policy after pee case in flight)

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया विमान कंपनीला गेल्या काही दिवसांत 2 आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये प्रवाशांना अनुचित वर्तन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे.

- Advertisement -

सुधारित धोरणानुसार, क्रू मेंबर्सने प्रवाशांना दारू उपलब्ध करून दिल्याशिवाय प्रवाशांना मद्यपान करण्याची परवानगी देऊ नये. तसेच, विमानात एखादा प्रवासी दारू पीत असेल, तर त्यावर लक्ष ठेवणे, असेही सांगण्यात आले आहे.

एअर इंडियाने सांगितले की, एअरलाइनने इतर एअरलाइन्सच्या सराव आणि यूएस नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन (NRA) च्या मार्गदर्शक तत्त्वांमधून त्यांच्या इन-फ्लाइट अल्कोहोल सेवा धोरणात देखील इनपुट घेतले आहेत. हे मुख्यत्वे एअर इंडियाच्या विद्यमान पद्धतीशी सुसंगत आहेत. अधिक स्पष्टतेसाठी काही बदल करण्यात आले आहेत. NRA ची ट्रॅफिक लाईट सिस्टीम ड्रग्सच्या गैरवापराची संभाव्य प्रकरणे ओळखण्यात आणि त्यावर बंदी घालण्यात क्रूंना मदत करेल. क्रूसाठी नवीन धोरण लागू करण्यात आले असून त्याचा प्रशिक्षण अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

तीन रंगांसह क्रू मेंबर्स सतर्क असणार आहे. ग्रीन रंगाचा अर्थ विमानात आलेला प्रवाशी अतिशय सामान्य आहे. प्लाईटमधील क्रू मेंबर्ससोबत चांगले वर्तन करणार करित आहे. अशा प्रवाशाला दारू सर्व्ह केली जाऊ शकते. पिवळ्या रंगाचा अर्थ प्रवाशी थोडा नशेत आहे. तर एअर इंडियाचे क्रू मेंबर्स कोणत्याही प्रवाशाला नशेत आहे, असे म्हणणार नाही. कोणत्याही प्रवाशाला मोठ्या आवाजात बोलणार नाहीत. जरी प्रवाशी तसा वागत असेल तरी देखील क्रू मेंबर्स त्याच्याशी चांगला बोलेल.

विमान प्राधिकरणाने एअर इंडियाला दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. प्रवाशांच्या गैरवर्तनाची माहिती न दिल्याने विमान प्राधिकरणाने एअर इंडियाला हा दंड ठोठावला आहे. याआधी प्रवाशाने विमान प्रवासात ज्येष्ठ महिलेवर लघुशंका केल्याप्रकरणी विमान प्राधिकरणाने एअर इंडियाला ३० लाखांचा दंड ठोठावला आहे.

गेल्या वर्षी पॅरिस येथून दिल्ली येथे येणाऱ्या विमान प्रवासात प्रवाशाने गैरवर्तन केले होते. ६ डिसेंबर २०२२ रोजी ही घटना घडली. AI-142 (Paris – New Delhi) या विमानात प्रवासी शौचालयात धुम्रपान करत होता. तो प्रवासी दारू प्यायला होता. विमान कर्मचाऱ्यांचे तो प्रवासी काहीच ऐकत नव्हता. तर दुसरा एक प्रवासी महिलेच्या आसनावर बसला होता. या दोन्ही घटनांची माहिती एअर इंडियाने विमान प्राधिकरणाला दिली नाही, असा ठपका ठेवत विमान प्राधिकरणाने एअर इंडियाला दहा लाखांचा दंड ठोठावला आहे.


हेही वाचा – बालाकोट हवाईहल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान होते आण्विक युद्धाच्या तयारीत, अमेरिकेकडून गौप्यस्फोट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -